विद्यार्थ्यांसाठी मनसे महावितरणाला भिडणार!

महावितरणा

महावितरणाने अघोषित भारनियमन बंद करा अन्यथा आंदोलन – मनसे.

News published by News24tas

जालना:- दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असताना जालन्यात विजेचा लपंडाव सुरू झाला असून यावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा आम्ही पालकांना व विद्यार्थ्याना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने कडून महावितरणाला देण्यात आला असून लवकर कारवाईची मागणी महेश नागवे यांनी केली आहे.

महावितरणा

मनसेची महावितरणाकडे नेमकी मागणी काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन देतांना म्हणले आहे की, सध्या शहरामध्ये आपल्या विभागामार्फत अघोषित भारनियमन सुरु आहे. वेळ काळ न पाहत आपल्या विभागातर्फे सर्रासरित्या 2-4 तासांसाठी विजपुरवठा खंडीत केल्या जात आहे. सध्या उन्हाळा तोंडावर आहे आणि त्यामध्ये सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणुन याच फेब्रुवारी 2025 मध्ये 12 वी आणि 10 वीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु होत आहे. अशा वेळी आपल्या विभागामार्फत कोणतीही पुर्वसुचना न देता अथवा देखभाल दिवस (सोमवार) वगळता सुध्दा सर्रासपणे 2-4 तासासाठी बत्तीगुल केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय निर्माण होऊन मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजचे शिक्षण हे मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर निर्भर झालेले आहे. त्यासाठी सातत्याने विज पुरवठा असणे आवश्यक आहे. तसेच शहरातील परिक्षा केंद्रावर देखील विजपुरवठा सातत्याने उपलब्ध असणे गरजेचे असेल जेणे करुन परिक्षा सुरळीत पार पाडणे सोईचे होईल. आपल्या अघोषित भारनियमनामुळे परिक्षा केंद्रांना आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये विभागाच्या या बत्तीगुल कार्यक्रमामुळे संतापाची तिव्र लाट निर्माण झालेली आहे. त्यामूळे आपणांस विनंती की, आपल्या विभागामार्फत अवेळी होणारी बत्तीगुल ही त्वरीत थांबवावी. देखभाल दिवस (पुर्वसुचनेसह सोमवार) व्यतिरिक्त होणारे अघोषित भारनियमन येत्या 2 दिवसांत बंद करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे अनोखे अंदोलन करुन विद्यार्थी व पालकांसाठी न्याय मागण्यात येईल याची दखल घ्यावी असा इशारा देत मनसे ने सदरील मागणी महावितरणाकडे केली.

 

जालना:- शहरात चालू असलेल्या त्या आंदोलनाला अखेर स्थगिती.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या