मुंबईत मारवाडी भाषेत बोला असा आग्रह करणाऱ्या व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी व कार्यकर्त्याचा चोप.
news published by news24tas
मुंबई:- मुंबईतील एका दुकानात एका महिलेला मराठीत बोलू नका बीजेपी येथे जिंकली आहे मारवाडीत बोला असा आग्रह एका व्यापाऱ्याने केला तेव्हा सदरील महिलेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात धाव घेत सर्व प्रकार सांगितला तेव्हा मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदरील व्यापाऱ्याला चागलाच चोप देत महिलेची व सर्व मराठी भाषिकांची माफी मागायला लावली.
सदरील महिलेने जेव्हा आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याशी संपर्क केला तेव्हा मी यांना ओळखत नाही असे सांगितले व कोणतीही मदत केली नाही असा आरोप सदरील महिलेने केला.आम्ही यांना आमदार केलं आमचे प्रश्न यांनी सोडवले पाहिजे असे सदरील महिलेने म्हणले.
आमदार मंगल प्रभात लोढा यांची या विषयावर प्रतिक्रिया.
मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला!, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे – मंगलप्रभात लोढा.
मुंबई ही सर्वांचीच आहे, पण सर्वात पहिली ती मराठी माणसाची आहे. त्यामुळे भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. भाजपच्या नावावर असे प्रकार कुणी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. मुंबई भाजपची असल्याचं सांगत एका मारवाडी दुकानदाराने मराठी महिलेला मारवाडी बोलण्याची सक्ती केल्याचा प्रकार गिरगावातील खेतवाडीमध्ये घडला होता. त्यावर लोढा यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईत मराठी न बोलता ठराविक भाषेत बोला अशी सक्ती कुणी करत असेल तर ती चुकीची आहे असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. तसेच भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
