अविनाश जाधव राजीनामा दिल्यावर ठाकरेंच्या भेटीला.
ठाणे:- राजीनामा दिल्यानंतर अविनाश जाधव राज ठाकरेंच्या भेटीला..काल अचानकपणे राजीनामा देणारे अविनाश जाधव राज ठाकरेच्या भेटीनंतर पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून कामाला लागले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल अचानकपणे जिल्हाअध्यक्ष पदाच्या राजीनामा दिला व विधानसभा निवडणुकीत ठाणे-पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून या अपयशाची जबाबदारी घेत त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले.व त्यानंतर अविनाश जाधव जे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात ते येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर इतर कोणत्या पक्षात प्रवेश घेतात की काय अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या परंतु आज अविनाश जाधव यांनी लाईव्ह येत या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला.
त्यांनी आज म्हणले मी फक्त जिल्हाध्यक्ष राजीनामा पदाचा दिला होता माझ्याकडे पक्षाचे नेते पद व नाविक सेनेचे पद आजही आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करणार मला इतर पक्षातून विचारणा केली तरी मी त्यांना एकच उत्तर देतो की माझ्या रक्तात राज ठाकरे आहेत मी इतर कोणत्याही पक्षात काम करणार नाही .
त्याचबरोबर अविनाश जाधव बोलताना म्हणाले की राज ठाकरे साहेबांनी मला भेटायला बोलावले आणि त्यांनी सांगितले की पराभव वगैरे काही नसते तू पुन्हा ठाणे- पालघर जिल्हाअध्यक्ष म्हणून काम हातात घे व साहेबांनी दिलेला आदेश हा आमच्या सर्वांना अंतिम आदेश असतो आदेशाचे पालन करत मी पुन्हा ठाणे- पालघर जिल्हाअध्यक्ष म्हणून नव्या ताकदीने कामाला लागलो आहे.साहेबांनी पुन्हा मला जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे असे अविनाश जाधव म्हणले.
काल राजीनामा देते वेळी नेमके काय म्हणाले अविनाश जाधव…
विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे. अशा मोजक्या शब्दात अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता
