मनसेच्या वर्धापन दिनी म्हणजेच ९ मार्च ला राज ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता.
news published by news24tas
मुंबई :- विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशमुळे व एकही आमदार निवडून न आल्यामुळे पक्षाला पुन्हा गळती लागू नये त्याचबरोबर आगामी महानगर पालिका निवडणुकीत उत्तम कामगिरी करता यावी या साठी राज ठाकरे लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवापासून सुरू असून कदाचीत येणाऱ्या ९ मार्चला पक्षच्या १९ व्या वर्धापन दिनी राज ठाकरे या निर्णयाची घोषणा करू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज ठाकरे कोणता निर्णय घेणार ?
राज ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार या कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागले असून राज ठाकरे कोण सोबत युती-आघाडी करण्याची घोषणा करणार की पुन्हा एकला चलो रे चा नारा देणार हे पहावे लागेल. परंतु मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे ९ मार्च ला पक्षातील अंतर्गत बादलावर निर्णय घेणार असून निष्क्रिय पदाधिकारी यांना घरचा रास्ता दाखवून राज ठाकरे तरुणांना संधी देणार असल्याची माहीती समोर येत आहे.
मनसेचा या वर्षी चा वर्धापन दिनाचा मेळावा राज ठाकरे मुंबईत घेणार नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच मुख्य मेळावे प्रामुख्याने मुंबईतच होतात परंतु या वर्षीचा वर्धापन दिनाचा मेळावा मुंबईत न होता पिंपरी चिंचवड शहरात होणार असल्याची माहिती समोर येत असून मनसे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांकडून तश्या आशयाचे पोस्टर सोशल मीडिया वर प्रसारित करण्यात आले आहेत.
