राज ठाकरेंवर कृपाशंकर सिंह यांची जहरी टीका.
News published by News24tas
मुंबई:– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणात गंगेच्या प्रदूषित पाण्यावर जी टिपणी केली होती त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्याचं वादावर आता भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी राज ठाकरेंवर टीका करत म्हणले की,राज ठाकरे हे भांग घेऊन विधान करतात.राज ठाकरे काय बोलतात त्यांच्या लक्षात राहत नाहीत. मनसैनिकांना काहीतरी करायला सांगतात, पण ते वेगळं काय करतात. मला वाटतं ते सकाळी उठल्यावर भांग घेतात’, अशी जहरी भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
मनसे कडून कृपाशंकर सिंह यांना प्रतिउत्तर.
कृपाशंकर सिंह यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला सुरवात झाली असून मनसे नेते अमेय खोपकर यांनी कृपाशंकर सिंग यांना प्रतिउत्तर देत म्हणले की रंगाची उधळण होत आहे. तर त्यांना मजा करू द्याना आणि स्वतः ही मजा करा. कशाला गलिच्छ राजकारण करता. तुमची लायकी नाही राज ठाकरें वर टीका करायची आणि जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल त्याच्या कानाखाली आवाज निघेल. महाराष्ट्र सैनिक गप्प नाही बसणार, कृपा शंकर सिंग यांनी इशारा देण्याइतपत ते काही मोठे नाही, राज ठाकरे साहेब म्हणतात तसं ते एक फेरीवाले आहेत. आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात, असा घणाघात खोपकर यांनी यावेळी केला आहे.
अर्जुन खोतकर यांच्या पाठपुवठ्यामुळे महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला गेला – ठाकूर.
