निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या अनेक योजनांची घोषणा लाभार्थ्यांना मिळणार मोठे गिफ्ट.
news published by news24tas
दिल्ली:- महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी ज्या प्रमाणे युती सरकारने लाडकी बहीण व अन्य योजनांची घोषणा व अंबलबजावणी केली होती त्याच प्रमाणे आता दिल्ली सरकारने देखील अनेक योजना सादर करत दिल्लीकरांना मोठे गिफ्ट दिले आहे व अनेक घोषणा देखील केल्या आहेत. त्यामुळे आता अनेक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून निवडणुकीत केजरीवालांना यांचा किती फायदा होतो ते बघावे लागेल.
केजरीवालांनी केलेल्या १५ मोठ्या घोषणा
महिला सन्मान योजना : लाभार्थी महिलेला २१०० रुपये येणार
संजीवनी योजना : ६० वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत उपचार
चुकीचे पाणी बिल माफ : पाण्याचे बिल चुकीने पाठवले गेल्यास पाणी बिल माफ
२४ तास पाणीपुरवठा : २४ तास स्वच्छ पाणीपुरवठा होईल
यमुना नदी स्वच्छ : यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना
रस्ते : दिल्लीतील रस्ते चांगल्या दर्जाचे करण्यात येतील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना : परदेशात शिक्षण घेणाऱ्या दलित मुलांचा खर्च करण्यात येईल.
विद्यार्थ्यांना मोफत बस : विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा, दिल्ली मेट्रोमध्ये ५० टक्के सूट
पुजारी आणि ग्रंथींना प्रत्येकी १८ हजार रुपये दिले जातील
मोफत वीज : भाडे तत्वावर राहणाऱ्यांनाही मोफत वीज
नवीन रेशनकार्ड : सर्व गरिबांना नवीन रेशनकार्ड मिळेल
गटारांची स्वच्छता : दिल्लीतील गटारांची स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना
मुलीच्या लग्नासाठी १ लाख : ऑटो, टॅक्सी चालकांच्या मुलीच्या लग्नासाठी १ लाख मिळतील
१० लाख रुपयांचा जीवन विमा : ऑटो रिक्षा चालकांना १० लाख रुपयांचा जीवन विमा मिळेल
सुरक्षा रक्षक : सर्व आरडब्ल्यूएसाठी खासगी सुरक्षा रक्षक देण्याची हमी
