लाडक्या बहणींचे निवडणुकीपूर्वी चे लाड बंद. खात्यातून पैसे वजा.
News published by News24tas
विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेल्या एका महिलेच्या खात्यातून पैसे परत घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेल्या एका महिलेच्या खात्यातून पैसे परत घेतल्याचा प्रकार समोर आला आहे
महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी युती सरकाने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिण योजना चालू केली त्यानंतर महाराष्ट्रतील असंख्य महिलांच्या खात्यात दर महिन्यात प्रत्येकी १५००/- रुपये वर्ग करण्यात आले तसेच निवडणुकीनंतर युती सरकारने याचं रकमेत आम्ही वाढ करून २१००/- रुपये करू असे आश्वासन देखील सरकारने लाडक्या बहिणींना दिले .परंतु आता या योजनेत अनेक लाडक्या बहिणी अपात्र होत असून ज्या महिलांनी योजनेचे निकष पूर्ण केले नाहीत अशा लाभार्थी महिलांना यातून आता अपात्र करण्यात येत आहे.
लाडक्या बहीणींचे पैसे सरकारी तिजोरीत जमा.
या कारवाई अंतर्गत धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एक खैरनार नावाच्या महिलेला सरकारकडून मिळालेले 7,500 रुपये पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा करावे लागले आहेत. तर ही महिला पात्र नसतानाही तिने अर्ज केल्यामुळे आणि दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत समोर आल्यामुळे तिचे पैसे सरकारने परत घेतल्याचं सांगितलं जात आहे.
तुम्हाला जमत नसेल तर आम्ही थैमान घालू– राज ठाकरे
