समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट करत करडांच्या मुलाचे फोटो केले व्हायरल.
News published by News24tas
बीड:- संतोष देशमुख खून प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात बीड जिल्हा गेले अनेक दिवसापासून चर्चेत आहे. अगदी हिवाळी अधिवेशनात देखील बीडच्या गुन्हेगारीचा व सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा चांगलाच गाजला. आता देखील हे प्रकरण थांबता थांबेना या सगळ्यात धनंजय मुंढे व वाल्मीक कराड यांच्यावर अनेक आरोप झाले. यासागळ्या गुन्हेगारीला धनंजय मुंढे यांचे वरदहस्त आहे आसा आरोप विरोधी पक्षाने व अंजली दमानिया यांनी केला.
दमानिया यांच्या कडून वाल्मीक कराड यांच्या मुलाचे फोटो व्हायरल .
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मागील काही दिवसांपासून अनेक पोस्ट सोशल मीडियावर करत बीडच्या प्रकरणात धनंजय मुंढे व वाल्मीक कराड यांना चांगलच घेरले आहे अनेक पुरावे व व्हिडिओ त्या सातत्याने पुढे आणत आहेत.आजदेखील त्यांनी दोन पोस्ट करत. सवाल उपस्थित केला की करडांच्या मुलाकडे शस्त्र परवाना नसताना कमरेला बंदूक कशी? तर दुसऱ्या पोस्टमध्ये एवढी महाग गाडी वाल्मीक करडांच्या कडे कशी व हे पैसे नक्कीच कष्टाचे नसतील अशी टिपणी देखील केली.
