विद्यार्थी व शासनाची फसवणूक तत्काळ थांबवा मनसे विद्यार्थी सेना आक्रमक.

विद्यार्थी

कोचिंग क्लासेसने तत्काळ विद्यार्थी व शासनाची फसवणूक थांबवावी -मनसे विद्यार्थी सेना

news published by news24tas 

यवतमाळ :- शहरासह जिल्हातील सर्व तालुक्यात मोठ्या संख्येने कोचिंग क्लासेस असून, या कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. विद्यार्थ्यांना आकारण्यात येणाऱ्या रकमेची पावती देणे बंधनकारक आहे. मात्र कोणत्याही कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांना अशी पावती दिली जात नाही. ज्या ठिकाणी सेवा किंवा वस्तुची विक्री होते, त्यावर नियमानुसार वस्तू व सेवा (जीएसटी) कर आकारल्या जातो. परंतु यातील एकाही कोचिंग क्लासेसकडून हा कर वसूल केला जात नाही किंवा संबंधित विभाग ते वसूल करून घेतले जात नाही. त्यामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत असल्याचे यांनी तक्रारीत म्हटले आहे. ज्या इमारतीत हे क्लासेस चालतात, त्या इमारती व्यावसायिक स्वरूपाच्या असायला हव्या. मात्र जिल्हात कोणत्याही क्लासेसची इमारत व्यावसायिक स्वरूपाची नाही किंवा कोचिंग क्लासेस चालविण्यासाठी परवानगीसुद्धा स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. सर्व क्लासेस कुणाच्यातरी घरी चालविले जातात. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न आहे

विद्यार्थी व शासनाची कश्या प्रकारे फासवणूक केली जाते ?

विद्यार्थी व शासनाची कोचिंग क्लासेस चालक कश्या प्रकारे फसवणूक करतात याची माहिती मनसेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आली .

१ ) कोचिंग क्लासेसच्या ठिकाणी विद्यार्थी संख्येनुसार पाकिंगची, शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे अपेक्षित आहे. मात्र अशा कुठल्याही व्यवस्था संबंधित क्लासेसमध्ये नसल्याचे अभिजीत नानवटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

२ ) गंभीर बाब ही की, याठिकाणी आग लागल्यास ती आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही उपाययोजना किंवा फायर सेफ्टी नाही. त्यामुळे अचानक आग लागल्यास जीवितहानीची शक्यता आहे.

३ )कोचिंग क्लासेसमध्ये असलेले वीजमीटरसुद्धा घरगुती वापराचे आहे. या सर्व कोचिंग क्लासेसची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अभिजीत नानवटकर यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास शिकवणी वर्गाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या प्रसंगी मनसे शहर अध्यक्ष अमित बदनोरे , प्रथमेश पाटील , साईराम कवडे, सागर झपाटे, श्रेयस पांडे, तुषार कटपेलवार,सोनू गुप्ता यांच्या सह समस्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपास्तीत होते.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा आमचे telegram चॅनल .

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या