विद्यार्थ्यांनो ‘absent fees’ भरू नका.मनसेच्या मागणी नंतर तंत्रशिक्षण विभागाने तत्काळ चौकशी समिती गठीत केली.
News publishedविद्यार्थ्यांनी by News24tas
छ.संभाजीनगर:- काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना छत्रपती संभाजीनगर च्या शिष्टमंडळाने तंत्रशिक्षण विभागाचे सह संचालक मा.श्री.अक्षयजी जोशी साहेब यांची भेट घेऊन श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालय येथे अभियांत्रिकी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून “Absent Fees” च्या नावाखाली 1500 ते 5000 रुपयांचा बेकायदेशीर दंड वसुल महाविद्यालय प्रशासन आकारत असल्याची तक्रार पुराव्यानिशी सहसंचालक साहेबांकडे निवेदनाद्वारे केली होत व येत्या दोन दिवसात सदर प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर अवघ्या दोन दिवसात महाविद्यालय प्रशासनाने पावले उचलत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागणीला गांभीर्याने घेत श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालयातील “Absent Fees” दंडाच्या तक्रारीवर तंत्रशिक्षण विभागाने चौकशी समिती गठीत केली असून लवकरच अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
यावेळी पाठपुरावा करताना मनसे जिल्हा अध्यक्ष मंगेश साळवे, जिल्हा सचिव कार्तिक फरकडे, निखिल ताकवाले, जिल्हा उपाध्यक्ष शुभम नवले, रितेश देवरे, शहर संघटक प्रणव बोकाडे, शहर सचिव रोहित ठेंगे, विभाग अध्यक्ष हर्षल आवळे आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
