विरोध झाला पण D.M. मंत्री झालेच.

Dhananjay munde:-विरोध झाला पण धनंजय मुंडे ऊर्फ D.M. शेवटी मंत्री झालेच.

news published by News24tas

बहुप्रतिक्षित असलेले महायुतीचे खाते वाटप जाहीर झाले असून कोणा कडे कोणते खाते येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर आज  या चर्चांना पूर्णविराम लागला व महायुती सरकार कडून मंत्र्यांच्या खात्याची यादी जाहीर करण्यात आली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम,प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन तर गणेश नाईक यांच्याकडे वनविभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

विरोध

धनंजय मुंडे यांची विरोधानंतर देखील मंत्रीपदी वर्णी.

बीड मध्ये झालेल्या संतोष देशमुख यांच्या यांच्या हत्याकांडानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा अनेकांनी विरोध केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांना कोणते खाते मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. खातेवाटपात धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठमंत्री हे खाते देण्यात आली व त्यानंतर त्यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले.

नेमके काय म्हणले धनंजय मुंडे?

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्या बद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा. सूनीलजी तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय प्रफुल्ल भाई पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. 

राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन.

 

 

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या