शेतकरी संघटनेतून योगेश कदम यांचा मनसेत प्रवेश.
News published by News24tas
जालना:- स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका जश्या जश्या जवळ येऊ लागल्या आहे तसे तसे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करताना दिसत आहे. जालन्यात देखील अनेक राजकीय भूकंप होत असून या भूंपाचा हादरा शेतकरी संघटनेला बसला असून शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले योगेश कदम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल झाले आहेत.त्यांनी सदरील प्रवेश हा २ महिन्याअगोदर मनसेचे जिल्हा अध्यक्ष रवि राऊत यांच्या उपस्थितीत केला होता. व दि.१० मे २०२५ रोजी मनसे जिल्हा अध्यक्ष रवी राऊत यांनी त्यांची तालुका अध्यक्ष पदी नेमणूक केली असून पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – कदम.
पक्षाने व जिल्हा अध्यक्ष रवि भैय्या राऊत यांनी मला ज्या विश्वासाने ही जबाबदारी दिली आहे त्याला मी कोणत्याही परिस्थित तडा जाऊ देणार नाही व जालना तालुक्यात तालुका अध्यक्ष म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती निश्चितपणे योग्य पद्धतीने पार पाडेल व आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन जालन्यात मजबूत अशी पक्ष बांधणी करू असे मनसेचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष योगेश कदम यांनी म्हणले आहे.
पावसाळा चालू होण्या आधीच अनेक ठिकाणी तळे! पावसाळ्यात जालन्याचे काय होणार!
अनेक अडचणींनी जुना जालना परिसरातील नागरिक त्रस्त! घरे सोडून जावे का?म्हणत व्यक्त केला संताप.
