संतोष काळजी करू नको म्हणत अविनाश जाधवांनी केली संतोषची पाठराखण.
News published by News24tas
ठाणे:– देशासह संपूर्ण महाराष्ट्रात गेली कित्तेक दिवस फक्त चर्चा आहे ती छावा चित्रपटाची. या चित्रपटाने आज पर्यंतचे अनेक रेकॉर्ड तोडले असून जवळपास ७०० कोटींची कमाई देखील केली आहे.हा चित्रपट जेवढा चर्चेत आला तेवढीच चर्चा या चित्रपटातील अभिनेत्यांची देखील झाली. विक्की कौशलने ज्या प्रकारे महाराजांचा गौरवशाली इतिहास सर्वांन समोर आणला त्यामुळे त्याचे कौतुक संपुर्ण सिनेरसिकांनी केले व औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्ना मात्र तिरस्काराचा धनी झाला. या सगळ्यात अजून एक कलाकार अत्यंत चर्चेत आला तो म्हणजे संतोष जुवेकर. संतोषने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की मी चित्रपट करते वेळी मूघलाचे पात्र करत असलेल्या एकालाही बोललो नाही ना त्यांच्याकडे बघितले.या त्याच्या वक्तव्यावर टोलर्स ने त्याला प्रचंड ट्रोल केले व सोशल मीडियावर मिम्स् चा पाऊसच पडला. आता याच ट्रोलर्सला उत्तर देत मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतोष जुवेकरची पाठराखण केली आहे.
काय म्हणाले मनसे नेते अविनाश जाधव?
संतोष जुवेकर हा मूळचा आमचा ठाणेकर, एक अतिशय उत्तम कलाकार, एक उत्तम मित्र आणि त्याच्यापेक्षाही एक चांगला माणूस. अनेक वेळेला मी संतोषला फोन करतो आणि सांगतो संतोष माझा एक कार्यक्रम आहे, प्लीज येशील का? मी त्याला नेहमी म्हणतो “आम्ही सत्तेत नाही माझ्याकडे पैसे नाहीयेत” संतोषनी आज तागायत कधीही या गोष्टीकडे पाहिले नाही, मित्र म्हणून किंवा आम्हा सगळ्यांवर प्रेम करणारा व्यक्ती म्हणून संतोष नेहमीच माझ्या सर्व कार्यक्रमाला मोफत येतो. नाशिक पासून पालघर पासून ठाण्यात कुठेही कार्यक्रम असेल आणि संतोषला जर मी आवाज दिला तर तो नेहमीच आमच्या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो. संतोष सध्या हे जे तुला ट्रोल करत आहेत ना त्यांच्या “आईचा घो” ….. काळजी नको करुस आम्ही तुझ्यासोबत आहोत… अशा शब्दात अविनाश जाधव यांनी ट्रोलर्स ची कानउघाडणी करत संतोषची पाठराखण केली.
जिंदगीया उजड जाती घर बनाने मैं ! तुम्हे शर्म नहीं आती तोडणे मैं!-जलील!
शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याची समाधि काढून टाका -संभाजी राजे.
