संभाजीनगरच्या शेख इरफानने ‘व्हॅलेंटाईन डे’ ला जालन्याच्या युवतीची केली हत्या.
News published by news24tas
संभाजीनगर:- जालन्यात राहणाऱ्या एका युवतीची तिच्याच प्रियकराने व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच हत्या केल्याची घटना समोर आली असून यामुळे जालन्यासह- संभाजीनगर भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आरोपीने शेख याने मृतदेह शेतात पुरला.
सदरील युवती मोनिका निर्मळ (रा.जालना) संभाजीनगर येथील महानगर पालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात काम करत असून रोज जालना ते संभाजी नगर प्रवास करत होती. याच दरम्यान तिची ओळख शेख इरफान शेख पाशा याच्या सोबत झाली होती. सदरील आरोपी हा रेल्वे येथील पार्किंग परिसरातील कर्मचारी असून दोघांचे मागील एकवर्षा पासून प्रेमसंबंध असल्याचे देखील समजते.ऐन व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच या नराधमाने सदरील युवतीचा खून करून स्वतःच्या लासूर स्टेशन येथील शेताच्या बंद खोलीत तिचा मृतदेह पुरला होता सदरील घटनेची चौकशी करत असताना या सर्व घटनेची माहिती कदम जालना पोलिसांना शोधण्यात यश मिळाले व आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
