सामंत आणि भूमरे यांनी का घेतली जरांगे पाटलांची भेट !

 मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली घेतली असून सदरील भेट ही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानली जात आहे.

जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज मंत्री उदय सामंत व खासदार भूमरे यांनी भेट घेतली असून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सदरील भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या भेटीत जरांगे पाटील यांनी अनेक मागण्याची सरकारला पुनः एकदा आठवण करून दिल्याचे देखील पाहायला मिळाले असून आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारला दिल आहे .मागील उपोषणावेळी दिलेल्या आश्वासनाची मुदत आता संपत आहे. 30 एप्रिल 2025 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आपल्या मागण्यांची आठवण जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा करून दिली .

सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करत आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी  मागणी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारपुढे ठासून मांडली असून कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया जलद करावी आणि प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी देखील जरांगे यांनी यावेळी केली आहे.
मराठा समाजाचे तीनही गॅझेटीयर लागू करण्याचा आग्रह देखील सरकारकडे जरांगे यांनी धरला असून
याबाबत 23 एप्रिल 2025 रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

जालन्यात धक्कादायक प्रकार ! तहसीलदारांनीच लाटले शेतकाऱ्यांचे 50 कोटी.

जालन्यात मनसेचे आंदोलन सुरू असतानाच कामाला सुरुवात!

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या