उपासाला भगर खाणाऱ्यांनी सावध व्हावे.
News published by News24tas
नांदेड:- सण उत्सव आले की येतात उपवास.उपवास म्हणले की अनेक जण उपवासाला साबुदाणा खिचडी,फळे व काही जण आवडीने भगर देखील खातात परंतु जर तुम्ही उपासाला भगर खात असाल तर सावध व्हा कारण महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात भगर खाल्याने अनेकांनी अन्न विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे त्यामुळे तुम्ही देखील भगर खतांना व्यवस्थित काळजी घ्या जेणेकरून तुमच्या सोबत असा कुठलाही प्रकार घडणार नाही.
भगर खतांना तुम्ही देखील खालील प्रमाणे काळजी घ्या.
१) बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा.
२) भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका, जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.
३) शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोधून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या वशम्या किंजा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.
४) भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा.
५) भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन अॅसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्तीनुसार मयदितच करावे. भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.
भगर विक्रेत्यांना नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या सूचना.
१) विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी.
२) भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या.
३) मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये.
४) सुटी भगर व खूले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये. अन्न व औषध प्रशासनाचे वतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल येईल अशी सूचना जिल्हा अधिकारी कार्यालयाने एक पत्रक काढत दिल्या आहेत.
