शेयर मार्केटची नवीन फसवणूक लाखों रुपये लुटले !

शेयर मार्केटच्या नावाखाली नवीन प्रकारची फसवणूक लाखों रुपये लुटले !

news published by news24tas

पुणे :-शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले आणि  १२ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी येथे ५ ते ३० जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी येथील ४० वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी (दि. ३१) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात संशयितांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

शेयर

इन्स्टाग्रामवरून शेयर मार्केटच्या नावाने आरोपीकडून फसवणूक.

फिर्यादी यांना इन्स्टाग्रामवरून शेअर मार्केटच्या संबंधित एक लिंक मिळाली. अगर आपको शेअर मार्केटके बारेमे सिखना है तो ग्रुप जाॅइन करो, असे त्यात नमूद होते. त्यानुसार फिर्यादीने संबंधित लिंकवर क्लिक केले. त्यानंतर फिर्यादी यांना एका व्हाटसअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. ग्रुपमध्ये संशयितांनी तसेच कस्टमर केअर म्हणून काम पाहणाऱ्या इतर संशयितांनी संगणमत करून शेअर मार्केटच्या नावाखाली आयपीओ विषयी फिर्यादीला माहिती दिली. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. तसेच तीन कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्याच्या नावाखाली एकूण १२ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली.

शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करतांना कोणती काळजी घ्यावी.

अनेक जन आता पारंपरिक गुंतवणुकी बरोबर शेयर मार्केटमध्ये देखील गुंतवणूक करत आहे परंतु अल्पावधीत जास्त पैसे कमवण्यासाठी काही जन शॉर्टकट चा वापर करतात कुठल्याही माहिती शिवाय शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात व अनेक घोटाळेबाज अशाच नवख्या गुंतवणूकदारांवर नजर ठेऊन असतात व योग्य वेळी त्यांची फसवणूक करून पसार होऊन जातात त्यामुळे शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करतांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर पैश्यांचे व्यवहार करणे टाळा व सोशल साईट वर मिळणाऱ्या फ्री टिप्स घेणे देखील टाळा.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

हर्षद मेहता कांदिवली ते किंग ऑफ स्टॉक मार्केट.

 

भांडुप:- जनतेसाठी मनसे पुन्हा मैदानात 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या