भोंग्यामुळे पुन्हा राज्यात वातावरण तापणार?

भोंग्यामुळे पुन्हा राज्यात वातावरण तापणार? आमदार शिंदेसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक.

news published by news24tas

सांगली:-अनधिकृत भोंग्यमुळे राज्यात पुन्हा वातावरण तापणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून त्याला कारण देखील तसेच आहे.सांगलीचे माजी आमदार शिंदेंनी व अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत सोमवारी निदर्शने सांगली सह संपूर्ण राज्यात निदर्शने करणार असल्याचे म्हणले आहे.

भोंग्यावर काय म्हणले आमदार शिंदे.

श्री. शिंदे म्हणाले, “प्रत्येक शहरातील प्रभागांत मशिदी आहेत. त्यांच्यावर असलेला भोंगा वाजल्यामुळे वृद्धांना, लहान मुलांना, विद्यार्थ्यास, जवळपास असलेले दवाखाने, नागरिक यांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. राज्यातील बहुतांश मशिदीवरील (Mosque) भोंग्यांचे परवाने नाहीत. याआधी मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे काढण्याबाबत अनेक हिंदुत्ववादी संघटनानी आंदोलने सुद्धा केली होती.

भोंगे
मात्र, यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंगे बंद करा, अशा पद्धतीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता हिंदू एकता आंदोलन संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत. महायुतीच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील मशिदीवरील भोंगे उतरून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र द्यावे, जेणेकरून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होईल.संपूर्ण राज्यात ‘हिंदू एकता आंदोलन’चे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. यावेळी ‘हिंदू एकता’चे शहर-जिल्हाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णू पाटील, प्रकाश चव्हाण, दत्तात्रय भोकरे, मनोज साळुंखे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरुण वाघमोडे, रवी वादवने, प्रदीप निकम, श्रीधर मिस्त्री, अविनाश मोहिते, ओंकार शिंदे उपस्थित होते.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या