Beed:-पोलिस चौकीतच हल्ला.

Beed /बीड की बिहार थेट पोलिस चौकी समोरच हल्ला.

News published by News24tas

बीड:- संपूर्ण राज्यात संतोष देशमुख यांच्या खुनाच्या मुद्याने संतापाची लाट पसरलेली असताना बीड मधली गुन्हेगार थांबता थांबेना रोज कोणत्या न कोणत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा हा राज्यभरात चर्चेत राहतोच. संतोष देशमुख यांच्या हत्त्येपासून ही सर्व प्रकरणे आता हळूहळू पुढे येत आहेत.

beed एवढी हिंमत या गुन्हेगाराची होतेच कशी

बीड जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पसरली आहे याचा अंदाज काल झालेल्या घटनेने समजून येते एक शुल्लक कारणावरून चक्क बीड मधील अंबेजोगाई येथील एका पोलिस चौकी समोरच एक तरुणाला कोयत्याने भोसकले. जमीर शेख असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून श्रीहरी मुंडे , आर्यन मांदले व अन्य दोघे यात मुख्य आरोपी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

एवढी हिंमत या गुन्हेगाराची होतेच कशी कायद्याचा धाक यांना कसकाय नाही व यांना कोणाचे वरदहस्त आहे ज्यांच्या जीवावर बीड जिल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे त्यांचा बंदोबस्त पोलीस कधी करणार ,सरकार याकडे लक्ष देणार की नाही हे देखील आता पाहावे लागेल.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या