Jalna/उद्या जालना शहरात रास्ता रोको!

जालन्यातील अंबड चौफुली येथे उद्या रास्ता रोको आंदोलन.

News published by News24tas

जालना:- जालना शहरातील मुख्य भाग असलेला परिसर म्हणजेच अंबड चौफुली जालना व अंबड यांना जोडणारा शहरातील मुख्य रस्ता असून उद्या या ठिकाणा रस्ता रोको आंदोलन होणार असून परिणामी येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सदरील आंदोलन जालन्यातील दिव्यांग बांधवांकडून केले जाणार असून वारंवार मागण्या करून देखील मागण्या मान्य न झाल्यामुळे सदरील रस्ता रोको केला जात असल्याचे दिव्यांच्या बांधवांनी सांगितले.

जालन्यात रस्ता रोको केव्हा व कशासाठी?


दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उद्या अंबड चौफुली येथे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उद्या दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता अंबड चौफुली येथे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.यामध्ये आंध्र प्रदेश मध्ये सहा हजार रुपये दिव्यांगाना मानधन सुरू आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू करा. जालना शहरातील मधुबन कॉलनी किंवा मस्तगड येथे दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करा अशा विविध मागण्यांसाठी अंबड चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आज दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे,जिल्हाध्यक्ष राहुल मुळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे, विठ्ठल चव्हाण, सुनंदा भास्करे,लक्ष्मी भुतडा, जगदीश सातपुते, सतीश वाघ,शेख शेफीग, शेख मिया, नागेश आबिलवादे,सुरेश बोर्डे आदिंची उपस्थित होती.

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला धमकी देणारा तो व्यक्ती कोण?

जालना पोलिस अधीक्षक कार्यालयात शिवसैनिकांची तुफान गर्दी.

नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.

आ.अर्जुन खोतकर शब्द पाळणार ? जालनेकरांना मिळणार मोठे गिफ्ट!

मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत शोधले संशयित !काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते अलर्ट!

भक्तांना होणाऱ्या गैरसोईकडे कोण लक्ष देणार?

नागरिकांच्या हितासाठी आयुक्तांकडे वेळ नाही का? – मनसे.

पाकिस्तानचा माज उतरवण्याची हीच खरी वेळ – लोणीकर.

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या