Jalna/जालना:-हिंदू बांधवांचा विराट मोर्चा.

Jalna hindu morcha|जालना शहरात सर्व हिंदू बांधव एकवटले.

News published by news24tas

जालना:- बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आज दिनांक १०/१२/२४ रोजी जागतिक मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी असंख्य हिंदू बांधवांनी एकत्रित येत अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे भव्य मोर्चा काढला. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदु बांधवांनी उपस्थित राहत जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले.यावेळी नागरिकांनी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

आज १० डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बांगलादेशी हिंदूंना संरक्षण देण्यात यावे तसेच बांगलादेशातील इस्कॉन टेम्पल चे महाराज चिन्मयजी महाराज यांना जी बेकायदा अटक करण्यात आली आहे त्यांना तात्काळ सोडण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नागरिकांसह,हिंदू संघटनेचे कार्यकर्ते व सर्व पक्षीय नेते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदू बांधवांच्या वतिने शहरासह तालुक्यातही मोर्चाचे आयोजन.

Jalna/जालना:-हिंदू बांधवांचा विराट मोर्चा.

जालन्यातील आठही तालुक्यात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परतूर तालुक्यातील मोर्चात बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी भारतात बांगलादेश आणि पाकिस्तान चे झेंडे फडकवणाऱ्याचे हात छाटा व त्यांच्यावर देशद्रोहचे खटले दाखल करा असे विधान केले.

बांगलादेशातील हिंदूची परिस्थिती बिकट.

जेव्हापासून ८४ वर्षाच्या मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सत्ता काबीज केली. तेव्हापासून दिवसेंदिवस बांगलादेशातील परिस्थिती बिकट होताना दिसत आहे दिवसन दिवस हिंदूंवर हल्ले वाढत आहेत तसेच अनेक मंदिरांवरती हल्ले देखील वाढत आहे. हिंदू मंदिर संस्था आलेल्या इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी येथे होत आहे बांगलादेशातून हिंदूंना पळवून लावण्यासाठी असे अनेक प्रकार तेथे घडत आहेत.ज्या बंगला देशाला पाकिस्तानापासून भारताने वाचवले तोच बांगलादेश आज भारतीयांवर अशा प्रकारे अन्याय करत आहे.

For more information & update follow like and subscribe 

सीमा वाद पुन्हा चिघळला वाचा संपूर्ण बातमी

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या