MNS Mumbai/आरिफ चा मनसे सत्कार !

Mumbai/मुंबईतील बोट दुर्घटनेत जीव धोक्यात घालून ३५ प्रवाशांचे प्राण वाचवणारे ‘देवदूत’ आरीफ यांचा मनसे कडून सन्मान.

News published by News24tas

मुंबई:- गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीडबोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. त्यात दोन्ही बोटींना जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला तर १०० जणांना वाचवण्यात यश आले आहे. या अपघातात स्वतःचा जीव धोक्यात घालून ३५ प्रवाशांचे प्राण वाचवणारे ‘देवदूत’ कोकणवासीय आरीफ बामणे (दाभोळ दापोली) यांचा मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष अँड वैभवजी खेडेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्याचा सन्मान केला .

mumbai-धाडस आणि शौर्याचे वैभव खेडेकर यांनी कौतुक केले

आरिफ बामणे यांनी दाखवलेले प्रसंगावधान, धाडस आणि शौर्याचे वैभव खेडेकर यांनी कौतुक केले. यावेळी म. न. कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपचिटणीस तथा म. न. बेस्ट कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. अनिश जी खंडागळे,ठाणे शहर प्रसिद्धी माध्यम प्रमुख धिरज पावसकर उपस्थित होते.

३५ प्रवाशांचे वाचवले प्राण दरम्यान, आरीफ हे पूर्वा बोटीवर बोटमास्टर असून ही दुर्घटना घडली तेव्हा तिथून काही अंतरावर त्यांची बोट होती. आरीफ यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेतली आणि किमान 35 प्रवाशांचे प्राण त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचवले. पायलट बोटीचा आधार घेत त्यांनी ३५ प्रवाशांना वासुदेव फेरीबोटीत सुरक्षितरीत्या नेले. तसेच एका साडेतीन वर्षीय चिमुकलीला देखील आरिफ यांनी जीवनदान दिले.

जालन्याचे पाहिले महापौर कोण? सेना,भाजप,मनसे काँगेस मैदानात – वाचा संपुर्ण बतमी.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या