MNS MUMBAI :-मनसेमुळे सिडकोला जाग.

मनसेमुळे सिडकोला जाग ! अभियंता भरतीत `मराठी’ विषय’ केला समाविष्ट मनसेचे संदीप पाचंगे यांच्या पाठपुराव्याला यश.

NEWS PUBLISHED BY NEWS24TAS

ठाणे – सिडको महामंडळामध्ये सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील एकूण १०१ रिक्त पदे भरण्यासाठी मागील वर्षी ऑनलाईन अर्ज मागविले होते. सदर परीक्षेकरिता असलेल्या अभ्यासक्रमातून मराठी विषय वगळल्याची तक्रार काही मराठी इच्छुक उमेदवारांनी मनसेचे संदीप पाचंगे यांच्याकडे केली होती. संदीप पाचंगे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर मराठी विषय परीक्षा प्रक्रियेत समाविष्ट केल्याची अधिसूचना सिडको प्राधिकरणाने काढली आहे.



सिडको महामंडळाने १८ जानेवारी २०२४ रोजी सहाय्यक अभियंता ( स्थापत्य) या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. इंग्रजी, सामान्यज्ञान, आकलन क्षमता, व्यावसायिक ज्ञान हे परिक्षेचे विषय देण्यात आले होते. एकूण २०० गुणांच्या या परिक्षेत मराठी हा विषय वगळण्यात आला होता. याबाबत इच्छूक मराठी उमेदवारांनी मनसेचे संदीप पाचंगे यांच्या कडे तक्रार केली होती. पाचंगे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व संबंधित प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला होता. अखेर संदीप पाचंगे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सिडको प्राधिकरणाने ९ जानेवारी २०२५ रोजी एक शुद्धीपत्रक काढत मराठी विषय परिक्षेत समाविष्ट केल्याचे जाहीर केले आहे. मराठी विषय समाविष्ट करण्यासाठी पाठपुरवठा करणाऱ्या संदीप पाचंगे यांचे मराठी उमेदवारांनी आभार मानले आहेत.

सहाय्यक कार्यकारी अभियंता पदासाठी मराठी विषय वगळल्याची तक्रार काही मराठी इंजिनिअर तरूणांनी माझ्याकडे केली होती. तसेच म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबई यांनी देखील मराठी विषय समाविष्ट करण्याची मागणी सिडकोकडे केली होती. यापूर्वी मराठी विषय समाविष्ट होता मात्र काही अधिकाऱ्यांनी मुद्दाम हा खोडसाळपणा केल्याचे निदर्शनास आले म्हणून त्यांची तक्रार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या व सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून ही शासन दरबारीच अशी उपेक्षा मनसे कदापि खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया संदीप पाचंगे यांनी दिली आहे.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या