Mumbai | Raj Thackeray:-अखेर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
News published by news24tas
विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे प्रसार माध्यमांसमोर आले नाहीत ना कोणती सभा ना कोणती पत्रकार परिषद त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी अनेक दिवसांपासुन संभ्रमात असून राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतू आता प्रतीक्षा संपली असून येत्या रविवार दि.१९ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता डोम सभागृह, एन.एस.सी.आय. (सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम), लाला लजपतराय मार्ग, वरळी-मुंबई-१८. येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यातील सर्व प्रमुख पदाधिका-यांचा व मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील गटाध्यक्ष व उर्वरित जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक- मा.राजसाहेब ठाकरे असणार आहेत.
मुंबई (mumbai) येथे सर्व पदाधिकारी व गटअध्यक्ष यांना उपस्थित राहण्याचे आदेश.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, प्रवक्ते, मुंबई,ठाणे,नाशिक,पुणे व संभाजीनगर जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शहराध्यक्ष, उप-शहराध्यक्ष, विभागअध्यक्ष, उप-विभागअध्यक्ष, शाखा अध्यक्ष, सचिव ,गटाध्यक्ष व उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हाअध्यक्ष ते उपशाखाध्यक्ष, तसेच महिला सेना, विद्यार्थी सेना व अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व आजी व माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेतात हे बघावे लागेल.
