Raj Thackeray:- राज ठाकरेंच्या महायुतीला मनसे शुभेच्छा

राज ठाकरे शपथविधीला अनुपस्थित पण दिल्या ‘मनसे’ शुभेच्छा.

फेसबूक पोस्ट करत दिल्या शुभेच्छा 

Published by news24tas

Raj Thackeray :-महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी भाजप व महायुती कडून करण्यात येत आहे. ५ तारखेला होणाऱ्या शपथविधीला देशातील १९ राज्याच्या मुख्यमंत्री व मुख्य नेत्यांना आमंत्रण महायुती कडून देण्यात आले आहे. या सोहळ्याला अनेक संत महांतना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून राज ठाकरे यांना आमंत्रण दिले होते परंतू राज ठाकरे यांच्या पारिवारिक भेटीगाठी ठरलेल्या असल्यामुळे आणि ते वैयक्तिक कारणास्तव शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना कळवली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती देत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाबाबत फोनवर शुभेच्छा देखील दिल्या व नंतर सोशल मिडिया अकाऊंट वरून देखील ठाकरी शैलीत विशेष शुभेच्छा देखील दिल्यात.

काय म्हणाले राज ठाकरे ?

आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते  यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.

२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.

पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.

पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की…

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !

राज ठाकरे. ( Facebook post)

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या