SENA vs BJP बेगडी हिंदुत्व कोणाचे?

SENA vs BJP बेगडी हिंदुत्व कोणाचे शिवसेना भाजपा पुन्हा आमने – सामने?

News published by news24tas

Maharashtra:- राज्याच्या निवडणूका झाल्या निकाल देखील लागले भाजपा बहुमतासह मित्रपक्षासोबत सत्तेत देखील आली. पण यासगळ्यात दोन मुद्दे गाजले ते म्हणजे ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि खरे हिंदूत्व कोणाचे अनेक आरोप प्रत्यारोप निवडणूकीत तर झालेच पण आता निकला नंतर शपथविधी होऊन देखील यावरून वाद चालूच आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वारंवार भाजपचे हिंदुत्व कसे बेगडी हिंदुत्व आहे हे सांगितले जात आहे तर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर वारंवार टिका होताना बघायला मिळत आहे.

शिवसेनेकडून भाजपवर निशाणा

शिवसेना उध्दव बाळासाहेब गटाकडून एक व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसिद्ध करत भाजपचे हिंदुत्व निवडणुकी पुरतेच असते निवडणुका झाल्या की हिंदुत्वाची विसर भाजपला पडते अशी टीका त्या व्हिडिओत करण्यात आली आहे.दादर पूर्व येथील हनुमानाचे मंदिर तोडण्याचे आदेश केंद्र सरकार कडून देण्यात आले आहे सात दिवसाच्या आत मंदिर हटवा अन्यथा सरकार हस्तक्षेप करेल व त्याचा खर्च देखील वसूल करेल यावरून शिवसेनेने भाजप सरकार विरोधात निशाणा साधला आहे.

व्हिडीओ साभार शिवसेना उध्दव ठाकरे गट

निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा.

हिंदू

भाजप नेते आमदार निलेश राणे यांनी देखील बांगलादेशातील हिंदूंच्या होणाऱ्या अत्याचारांच्या व अन्यायाच्या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा साधत टिका केली व म्हणले की, जनतेने निवडणुकीत उद्धव ठाकरेला आपटले,

दुसऱ्यादिवशी पत्रकार परिषद, मी कुटुंबप्रमुख होतो वगैरे वगैरे…

त्यानंतर पूर्ण ठाकरे कुटुंब लंडनला रवाना…

अधिवेशन सुरू झालं त्याच्या आदल्या रात्री आदित्य मुंबईत…

काल रात्री उद्धव ठाकरे लंडन फिरून परतले…

आज त्यांना बांगलादेशातला हिंदू आठवला…

एकूणच हिंदुत्वाच्या मुद्यावरून पुन्हा भाजप शिवसेना सामने सामने असल्याचे पहिला मिळत आहे.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या