नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.

तत्काळ देश सोडण्याच्या पाकिस्तानी नागरिकांना सरकारच्या सूचना.

News published by News24tas

मुंबई:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानंतर देशासह महाराष्ट्रातील सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली असून यंत्रणेने महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी काढली असून त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तब्बल ५०२३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे तर एकट्या नागपुरात सर्वाधिक म्हणजेच २४५८ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे आढळून आहे व त्यानंतर ठाण्यात ११०६ पाकिस्तानी आढळून आले आहेत. यामध्ये फक्त ५१ जणांकडे वैद्य कागदपत्रे आढळून आले आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे यापैकी १०७ लोक हे बेपत्ता असून त्यांचा शोध लागतं नाहीये. त्यांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन त्यांना परत पाठवण्यात येईल असे यंत्रणेमार्फत सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी तयारी चालू – फडणवीस

 

सदरील विषयावर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त झाली असुन प्रत्येक पोलिस स्टेशनला या संदर्भात सूचना दिली जात आहे. संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून लवकरात लवकर जो कोणी अधिक काळ राहत असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर शिवसेनेच्या ( ubt )नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीला लावलेली अनुपस्थिती संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले शत्रूचा हल्ला किंवा देशावरील संकटकाळात नेहमीच देशातील सर्व राजकीय पक्ष आजवर एकत्र राहिलेले आहेत. अटलजींनी देखील इंदिराजींना पाठींबा दिला होता परंतु या बैठकीस अनुपस्थित राहून उठाबाने जो मनाचा छोटेपणा दाखवला आहे त्याला देशातील जनता कधीच माफ करणार नाही.

मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत शोधले संशयित !काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते अलर्ट!

भक्तांना होणाऱ्या गैरसोईकडे कोण लक्ष देणार?

पाकिस्तानचा माज उतरवण्याची हीच खरी वेळ – लोणीकर.

नागरिकांच्या हितासाठी आयुक्तांकडे वेळ नाही का? – मनसे.

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या