अस्मितेसाठी लढणारे गुंड की कार्यकर्ते?

मराठी भाषेसाठी लढणारे मनसेचे गुंड मग कन्नड भाषेसाठी आग्रही असणारे कोण?

News published by News24tas

मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि परप्रांतिय वाद हा विषय काही नवीन नाही.यामुळे अनेक वेळा महाराष्ट्रासह देशभरात अनेकदा वाद झालेला आहे.असाच काहीसा वाद आता पुन्हा एकदा होताना दिसत आहे आणि त्याला कारण म्हणजे डिमार्ट येथे झालेला वाद. मुंबई येथील एका डिमार्ट मध्ये मनसे पदाधिकारी खरेदारीसाठी गेले असता तेथील एका कर्मचाऱ्यांसोबत त्यांची मराठी बोलण्या वरून बाचाबाची झाली व कर्मचाऱ्याने उद्धटपणे उत्तरे दिल्यामुळे व मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे संतप्त मनसे पदाधिकारी तेथे जमा झाले व संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारत त्याला माफी मागायला लावली.

कार्यकर्त्यांना गुंड ठरवण्याचा अधिकारी हिंदी मिडियाला कोणी दिला?

सदरील झालेल्या वादानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.हिंदी व मराठी प्रसार माध्यमांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली व बातम्या चालवल्या परंतु अनेक हिंदी प्रसार माध्यमांनी ‘मनसे की गुंडागर्दी’ अशा आशयाची बातमी लावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच टार्गेट केले.मुळात मराठीचा आग्रह धरणाऱ्या व मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना गुंड ठरवण्याचा अधिकारी हिंदी मिडियाला कोणी दिला आणि दिलाच असेल तर कन्नड भाषिकांची दादागिरी या मिडियाला दिसत नाही का? असा प्रश्न आता अनेक जण करू लागले आहे.त्यातच संदेश देसाई यांनी देखील हिंदी मिडीयाचा एक व्हिडिओ पोस्ट करत म्हणले की ,मारहाण नाही चागल्या भाषेत झापड देऊन मराठी महत्त्वाची असे सांगून आलो असे देसाई म्हणाले.

ये तो अपूण जैसा निकाल… हम होंगे कंगाल वर राऊतांचे ट्विट.

शिवाजी महाराजांचे बॅनर फाडल्याच्या घटनेला नवीन वळण.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या