राज ठाकरेंचा आदेश आणि ठाण्यातून आंदोलनाला सुरुवात.
News published by News24tas
ठाणे:-गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मनसेचा पाडवा मेळावा पार पडला व राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडली. राज ठाकरेंनी या सभेत अनेक महत्वाच्या मुद्यावर भाष्य करत सरकारवर आपली तोफ डागली. व त्याचबरोबर मराठी भाषेबाबत देखील अनेक महत्वपूर्ण सूचना कार्यकर्त्यांना त्यांनी केल्या.यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की जर तुम्हाला महाराष्ट्रात मराठीचा मान राखता येत नसेल तर कानाखाली ही पडेलच. महाराष्ट्रात अनेक बँका आहेत जिथे मराठी दिसत नाही बोलली जात नाही अश्या बँकांना देखील तुम्ही भेटून मराठीचा आग्रह केला पाहिजे असे राज ठाकरे म्हणताच मनसेने बँकांना भेटी द्यायला सुरुवात केली असून याची सुरवात ही ठाण्यातून झाली आहे.
अविनाश जाधवांना महिलेचा कॉल येताच जाधव बँकेत.
ठाण्याचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाण्यातून एका महिलेचा कॉल आला व त्या महिलेने अविनाश जाधव यांना सांगितले की तुमच्याच मनसेच्या शाखेजवळ एका SBI बँककेच्या शाखेत मराठी कुठेच दिसत नाही.याविषयी कॉल वरून माहिती मिळताच अविनाश जाधव सदरील बँक शाखेत पोहचले व तेथील हिंदीतील बॅनर काढत निवेदनाव्दारे त्यांनी बँकेला विनंती केली की येथे मराठी भाषेचा वापर करण्यात यावा.
त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना जाधव म्हणाले की, यांनी जर मराठी पाट्या लावल्या नाही तर आम्ही त्या स्वखर्चातून लावू व त्यांना जर सध्या भाषेत समजले नाही तर त्यांना आमच्या रागाला सामोरे जाऊन मार खावा लागेल असे जाधव म्हणाले.
त्या औरंगजेबाची कबर बघायला लहान मुलांची सहल नेली पाहिजे!- ठाकरे.
जालन्यातील शिवाजी महाराजांचे बॅनर फाडणारा काँग्रेसचा कार्यकर्ता!
