औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर जरांगे पाटलांचे रोख ठोक मत.
News published by News24tas
जालना:- सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे ती औरंगजेबाच्या कबरीची. छावा चित्रपट जेव्हा संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला तेव्हा पासून ज्या प्रकारे औरंगजेबाने संभाजी महाराजांना यातना दिल्या त्या बघून समस्त महाराष्ट्रात जनतेच्या मनात क्रूरकर्मा औरंगजेबाबद्दल द्वेष निर्माण झाला असून त्याची कबर काढून टाकावी असे मत आता अनेक राजकीय नेते मांडत आहेत आहेत. याच सर्व कबरीच्या प्रकरणावर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका करत भाष्य केले आहे.
कबरीला अगरबत्ती,अत्तर लावा म्हणणारे हेच आणि कबर हटवा म्हणून हेच सांगतात-जरांगे.
औरंगजेबाच्या कबरीवरून पत्रकाराने ज्यावेळी जरांगे पाटील यांना विचारले की, तुम्ही कबर हटवण्यास सहमत आहात का त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना ती कबर हटवायचीच नाहीये. आधी कबर हटवा म्हणून म्हणतात व लगेचच त्या कबरीला सुरक्षा पुरवतात कबर हटवायचीच आहे तर मग सुरक्षा कशाला? औरंग्याची कबर इकडे संभाजी नगरला आणि दंगल कुठे तर देवेंद्र फडणवीसांच्या घरात नागपूरला ही काय त्यांच्याच घरात काम करणारी लोक होती का? आता त्यात अडकणार कोण तर आमची गोर गरीब पोर असे म्हणता जरांगे यांनी फडणवीस यांच्यावरच आरोप केलेत. व बोलताना म्हणाले की २०२२- २३ साली २लाख ६० हजार त्या कबरीसाठी कोणी दिलेत मोदी साहेबांनीच ना म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात कबर काढा आणि यांचे कॅप्टन अगरबत्ती,अत्तर,फुलाला व हाराला पैसे देतात अशा प्रखर शब्दात जरांगे यांनी सरकारवर टीका केली आहे.
