जरांगे पाटील यांची सरकारवर सडकून टीका.
News published by News24tas
जालना:- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर सडकून टीका केली असून देवेंद्र फडणवीस काम झाले की बाजूला करणारे आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस,अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. अजितदादा पवार हे जातीवादादाला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदे का देतात असा सवाल करत त्यांना देखील यामुळे मोठी किंमत मोजावी लागेल असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणले आहेत.
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीपूर्वी केलेला हा डाव असू शकतो. – जरांगे
सदरील विषयावर बोलताना जरांगे पाटील यांनी यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता6 टीका केली असून त्यांना मिळणार असलेल्या मंत्रिपदावर भाष्य करत म्हणले की हा सगळा डाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी साठी असू शकतो. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसींची मते मिळवण्यासाठी त्यांना तात्पुरत्या वेळेसाठी मंत्रीपद देण्याचे काम युती सरकारने केले असल्याची शक्यता मनोज जरांगे पाटील यांनी वर्तवली आहे. व यावेळी त्यांनी म्हणले की, त्यावेळी देवेंद्र फडणवीस राजकीय पटलावरून बाजूला जात होते तेव्हा त्यांनी शिंदे यांना सोबत घेतले व काम झाले की बाजूला केले.
