चक्क पोलिसांनीच घेतली मटका चालू ठेवण्यासाठी लाच

जालन्यातील धक्कादायक प्रकार उघडीस.

News published by News24tas

जालना:- जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैद्य धंदे चाकू असून या सगळ्याला पोलिसांचे वरदहस्त असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही व यामुळे अनेक तरुण हे या अवैद्य धंद्याच्या नादी लागून आपले आयुष्य खरब करून घेत आहेत.पोलिसांनी अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे अपेक्षित असताना काही ठिकाणी पोलिसांच्याच कृपा आशीर्वादाने सर्रासपणे अवैद्य धंदे चालू असून काही पोलिसच या अवैद्य धंदे करणाऱ्यांना आश्रय देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदरील धंदे हे खुलेआम चालू असून यावर कोणतीही कारवाई होत नाही. अशाच एका प्रकरणात एसीबीने जालन्यातील दोन पोलिसांना लाच घेतांना रंगे हात पकडले असल्याची घटना उघडकीस आली आहे.

अवैद्य धंदे चालू ठेवण्यासाठी २५ हजारांची लाच घेतांना अटक.

जालन्यात २५ हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जालना तालुका पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकांना व हवालदाराला रंगे हात पकडून ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक राकेश चौधरी यांनी जालना तालुका पोलिस स्टेशन येथे सापळा रचत सदरील कारवाई केली आहे. परशुराम पवार व लक्ष्मण शिंदे अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. तालुका पोलिस स्टेशन च्या हद्दीत एका व्यक्तीचा मटक्याच्या व्यवसाय असून तो सुरळीत पणे चालू ठेवण्यासाठी तालुका पोलिस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक परशुराम पवार व पोलिस हवालदार लक्ष्मण शिंदे यांनी मटका चालकाकडे २५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने मटका चालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या