आमदार अर्जुन खोतकर यांची विधासभेत दोषींवर कारवाईची करण्याची मागणी.
News published by News24tas
जालना:- शहरातील मुख्य भाग असलेल्या कन्हैया नगर येथील चौकात शिवाजी महाराजांचे बॅनर फाडण्याचा एक युवकाने दिनांक १७/०३/२०२५ रोजी प्रयत्न केला असून या माध्यमातून सामाजिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पोलिसांनी एकाला अटक करत योग्य वेळी कारवाई केली. याप्रकरणी विठ्ठल राजू झुंडरे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १९६ व २९९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती संदीप भारती यांनी दिली आहे.
बॅनर फाडणारा तो युवक कांग्रेस चा कार्यकर्ता – खोतकर.
सदरील प्रकरणाची जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी गंभीर दखल घेत हा मुद्दा थेट विधानभवनात मांडला असून सदरील कृत्य हे अत्यंत चुकीचे असून आरोपी हा काँग्रेसच कार्यकर्ता आहे व आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी.अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ उत्तर देत म्हणले की, सदरील व्हिडिओ मी स्वतः बघितला आहे व कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
होळीला गालबोट चक्क परप्रांतीयांकडून पोलिसावरच प्राणघातक हल्ला.
