जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बस अपघातात दोघे ठार.
News published by News24tas
अंबड:- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बस अपघात झाल्याने दोन प्रवासी ठार झाले व अन्य चौघांवर उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती मिळाले असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहेत अशी माहिती अती.जिल्हाशल्य चिकीत्सक रामेश्वर गाडेकर यांनी दिली आहे
.
जालन्यात ब्रेक न लागल्याने झाला अपघात.
सदरील अपघात हा बसचे ब्रेक लागले नाही यामुळे झाला असून बस थेट स्थानकावर जाऊन पोहोचली यामुळे तेथील प्रवासी जखमी झाले असून दोन जण ठार झाले आहेत. याविषयी अती.जिल्हा शल्यचिकित्सक रामेश्वर गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अंबड येथील बस अपघातात मुरलीघर आनंद काळे वय ६० वर्षे राहणार शेवगा व खालील उल्हा अजीम उल्ला शेख वय ७५ वर्षे राहणार बुऱ्हाणनगर जालना अशी मृतांची नावे असून अन्य चार जण जखमी झाले आहेत.
