जुना जालना भागातील अघोषित लोडशेडींगमुळे मनसे आक्रमक!

 तात्काळ कारवाई करा अन्यथा अधिकाऱ्यांना अंधारात बसवू -मनसे.

News published by News24tas

जालना:- मागील काही दिवसांपासून जालन्यातील जुना जालना भागातील मोती बाग परिसर,संजय नगर, शिवनगर, कांचन नगर, नूतन वसाहत, समर्थ नगर,शंकर नगर, कचेरी रोड या भागात महावितरणतर्फे एक प्रकारची अघोषित लोडशेडींगच चालू असल्याने जुना जालना भागातील नागरिक या कारणामुळे त्रस्त झाले आहेत. कोणतीही पूर्व सूचना न देता दररोज अनेक तास वीजेचा लपंडाव हा या भागात चालूच असतो त्यामुळे येथील व्यावसायीकांसह येथील महिला वर्ग व नागरिक देखील हैराण झाले आहेत. याच समस्येचा तत्काळ तोडगा काढण्यात यावा यासाठी आज सकाळी ११ बाजेच्या सुमारास जालना शहरातील सर्व मनसे पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी महावितरण कार्यालयाला धडक दिली व तत्काळ या विषयावर उपाय योजना कराव्या अशी मागणी केली.

कारवाई करून उपाय योजना न केल्यास अधिकाऱ्यांना अंधारात बसवू.

सदरील प्रकरणी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व राजकीय पक्षांनी निवेदन व मोर्चे काढले असतील परंतु तुम्ही जर लवकरात लवकर महावितरणकडून या प्रश्नी कारवाई नाही केली तर आम्ही महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कुठलेही मोर्चे निवेदन पुन्हा देणार नाही आम्ही थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची व घरच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित करू व सामान्य जनतेला जो त्रास होतोय त्याची जाणीव तुम्हाला या माध्यमातून करून देऊ असे देखील यावेळी उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हणले आहे.यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगधरे, जिल्हा सचिव विलास तिकांडे, शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे, मनविसे शहर अध्यक्ष महेश नागवे, मनविसे शहर उपाध्यक्ष वैभव साळे, तालुका अध्यक्ष योगेश कदम,बळीराम राऊत ,राम लोहकरे,प्रदिप जाधव,यश सतकर,कृष्णा खरात,सुरेश सतकर,शेर खान,रवी खुपसे,सौरभ नन्नवरे, अकाश चोरमारे , प्रसाद कुलकर्णी व अन्य पदाधिकारी व व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यावर प्रश्नाचा भडिमार!

विद्यापीठाचा भोंगळ कारभाराने विद्यार्थी त्रस्त! गाऱ्हाणे ऐकायला एकही अधिकारी नाही

राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या हुंडाबळी प्रकरणाची चर्चा,मात्र गरोदर पूजाला न्याय अजूनही का नाही? 

 

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या