नागरिकांच्या हितासाठी आयुक्तांकडे वेळ नाही का? – मनसे.

जालना महानगर पालिकेत निवेदन देताना मनसे कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची.

News published by News24tas

जालना:- जालना शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून महानगर पालिकेचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेक चौकात,उघड्या जागेवर व मैदानात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढत असून यामुळे शहरात रोगराई देखील पसरत आहे व अनेक मुके जनावरे देखील या घाणीत असलेल्या प्लास्टिकचे शिकत होताना निदर्शनास येत आहे आणि याला जबाबदार देखील महानगर पालिका असून कचरा गाड्यांची असलेल्या अनियमिततेमुळे शहरात येवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. आणि हीच बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मनसे पदाधिकारी गेले असता महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे त्यांच्या दालनात उपस्थित न्हवते व त्यामुळे मनसे पदाधिकारी व मनपा कर्मचारी यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.

आयुक्त उपस्थित नसल्यामुळे आयुक्तांच्या दालनाला मनसेने दिले निवेदन.

वेळ घेऊन देखील आयुक्त साहेब हे कार्यालयात आले नाही व जेव्हा जेव्हा महाराष्ट्रा नवनिर्माण सेना त्यांच्याकडे जनतेचे प्रश्न घेऊन जाते तेव्हा तेव्हा आयुक्त संतोष खांडेकर हे महानगरपालिकेतून गायब होतात त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे आहे का नाही अश्या आक्रमक शब्दात मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी येथील कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली व त्यावेळी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना फोन केला असता त्यांनी उपायुक्त यांना निवेदन देण्याची विनंती केली परंतु आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी ती विनंती मान्य न करता थेट आयुक्तांच्या बंद असलेल्या दालनाच्या निवेदन देत अनोख्या पद्धतीने त्यांचा निषेध नोंदवला.

नेमकी कोणती मागणी घेऊन मनसे पदाधिकारी पालिकेत धडकले होते?

शहरातला वाढती घाण ही कचरगाड्या वेळेवर येत नसल्यामुळे होत आहे व कचरा गाड्यांवर जे आव्हान गीत लावले जाते ते हिंदी,भोजपुरी या भाषेत असून ते तात्काळ बदलून मराठीत करावे व सर्व शहरात दैनंदिन कचरा गाड्या सुरू कराव्यात ज्यामुळे शहरातील घाण व कचरा कमी होईल या मागणीसाठी मनसे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष रवी राऊत यांचे निवेदन घेऊन शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे, जिल्हा सचिव विलास तिकांडे ,मनविसे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब काळे, मनविसे शहर अध्यक्ष महेश नागवे, मनविसे शहर उपाध्यक्ष वैभव साळे व इतर कार्यकर्ते महानगर पालिकेत पोहचले होते.

पाकिस्तानचा माज उतरवण्याची हीच खरी वेळ – लोणीकर.

मराठीच्या मुद्द्यावरून आयुक्ताची गाडी फोडण्याचा मनसेचा इशारा.

Jalna:- जालन्याचे पहिले महापौर कोण?

सामंत आणि भूमरे यांनी का घेतली जरांगे पाटलांची भेट !

जालन्यात धक्कादायक प्रकार उघडकीस! माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकी

अर्जुन खोतकरांची मागणी आणि सभागृह बंद.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या