पाकिस्तानचा माज उतरवण्याची हीच खरी वेळ – लोणीकर.

भारतीय सैनिक नक्कीच पाकिस्तानला धडा शिकवतील – बबनराव लोणीकर.

जालना:- काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारताच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तान बदल राग निर्माण झाला असून लवकरात लवकर पाकिस्तानला धडा शिकवण्यात यावा अशी मागणी संपूर्ण भारतातील नागरिक करत आहेत.उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत फिरायला आलेल्या नागरिकांपैकी तब्बल २६ नागरिक या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत.त्यामुळे काश्मीर मध्ये ३७० कलम काढल्यापासून जो पर्यटनाचा ओघ निर्माण झाला होता त्याला देखील आता ब्रेक लागण्याची शक्यता जानकर वर्तवत आहेत.

आमदार लोणीकर यांची देखील दहशतवादी हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया.

शेत

उन्हाळी सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. जम्मू-काश्मीरमधील अलीकडच्या काळात झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. २६ पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पहलगाम हे पर्यटन स्थळ आहे. इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. इथे मोठ्या संख्येने पर्यटक असताना हा दहशतवादी हल्ला झाला असून पहलगामच्या सौंदर्याला काल रक्तरंजित करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री श्री अमित शहा यांनी याबाबत कठोर भूमिका घेऊन पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या वतीने भारतीय सैन्याला आपले निर्णय स्वतः घेण्याची पूर्ण मुभा दिलेली आहेच परंतु याहीपेक्षा कठोरातील कठोर भूमिका घेऊन अतिरेक्यांना आणि पाकिस्तानला अद्दल घडवण्याची हीच वेळ आहे. भारत सर्व दृष्टिकोनातून सक्षम असून या अतिरेकी हल्ल्‌याचा भारताकडून नक्कीच सर्जिकल स्ट्राइक सारखे उत्तर मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय सैन्यावर देशभक्त भारतीयांचा १००% विश्वास असल्याचे आ. बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.

Jalna:- जालन्याचे पहिले महापौर कोण?

मराठीच्या मुद्द्यावरून आयुक्ताची गाडी फोडण्याचा मनसेचा इशारा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या