पुणे येथील त्या बसस्थानकात शेकडो बलात्कार झाले असतील – मोरे

शिवसेना नेते वसंत मोरे यांची बस आगारात जाऊन तोडफोड खळबळजनक दावे.

news published by news24tas

पुणे:- पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगार व गुन्हेगारी वाढतच चालली आहे. त्यातच स्वारगेट येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेने तर संपूर्ण पुण्यासह महाराष्ट्र देखील हादरला असून अनेक जण यावरून तीव्र संताप व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राची हळूहळू बिहारच्या दिशेने वाटचाल होत आहे की काय असाच प्रश्न या सदरील घटनेने अनेकांना पडू लागला असून महाराष्ट्रातील एवढ्या गजबजल्या ठिकाणी आपल्या माता भगिनी सुरक्षित का नाहीत याला जबाबदार कोण ? महिलांना अशा मानसिकतेपासून कोण वाचवणार प्रशासन या साठी काय उपाययोजना करणार असे संतप्त प्रश्न आता उपस्थित होत आहेत त्यातच आता पुण्याचे शिवसेना उठाबा गटाचे नेते वसंत मोरे यांनी याच घटनेशी संबंधित अजून काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

मोरे यांचा लाईव्ह व्हिडिओ करत स्वारगेट स्थानकात तोडफोड.

मोर

कधी काळचे मनसे चे नगरसेवक व आताचे शिवसेनेचे उठाबा गटाचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी घटनास्थळी जात बस आगर सुरक्षा रक्षकांची केबिनच फोडली व तेथील भयावह वास्तव सर्वांसमोर आणले.सदरील स्थानकात जुन्या बस असून त्या बसमध्ये साड्या, कपडे व कंडोमचा खच पडलेला आढळला असून इथे कित्येक जणांवर बलात्कार झाला असेल असा प्रश्न मोरेंनी लाईव्ह मधून विचारला आहे.

स्वारगेटच्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई.

मोर

बलात्काराच्या घटनेने संपूर्ण पुण्यात व महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असून सरकारने देखील आता कारवाईला सुरवात केली असून स्वारगेट स्थानकातील २३ सुरक्षा रक्षकांना सस्पेंड करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले असून त्या २३ कर्मचाऱ्यांच्या जागी उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.त्याचबरोबर डेपो मॅनेजर व वाहतूक व्यवस्थापक यांची चौकशी करून एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा आमचे telegram चॅनल .

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या