फायनान्स कंपन्या कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता कामे करतात -मनसे.
News published by News24tas
जालना:– दिवसेंदिवस लोकांच्या गरजा ज्या प्रकारे वाढत चालल्या आहेत त्या प्रकारे त्यांना अनेक कंपन्या आर्थिक सहाय्य करून गरजेच्या वस्तू देखील सहज पद्धतीने उपलब्ध करून देतात. व अनेक लोक देखील विविध कंपन्याच्या फायनान्स च्या सुविधेचा लाभ घेत अनेक वस्तू खरेदी देखील करतात परंतु खरेदी झाल्या नंतर ज्या वेळी घेतलेल्या कर्जाची फेड करते वेळी जर एखादा जरी हफ्ता चुकला तर ज्या मानसिक त्रासाला ग्राहकाला सामोरे जावे लागते ते त्रास सहन करून नक्कीच तो ग्राहक फायनान्स घेऊन चूक झाली असेच म्हणतो आणि या सगळ्याला कारण म्हणजे फायनान्स कंपन्यांची बेकायदेशीर चालू असलेली वसुली या वसुलीमुळे महाराष्ट्र सह जालन्यात देखील अनेक नागरिक वैतागलेले असून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही आर्थिक अडचणींमुळे जर एक जरी हफ्ता थकला तर फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी त्या ग्राहकाला अर्वाच भाषेत शिवीगाळ करतात तर कधी कधी रस्त्यातच थांबवून गाडी गोडाऊनला जप्त करण्यासाठी सांगतात. याच सर्व त्रासाला कंटाळून अनेक नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी या नागरिकांच्या मदतीने धावून जात थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन देत तत्काळ कारवाईची मागणी केली व कारवाई न झाल्यास फायनान्स कंपन्या व मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जो संघर्ष होईल त्याला प्रशासन जबाबदार असे मनसे तालुका अध्यक्ष योगेश कदम यांनी म्हणले आहे.यावेळी जिल्हा उपअध्यक्ष शरद मांगधरे, बाळासाहेब काळे, वैभव साळे,चक्रधर धनदाईत व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फायनान्स कंपन्या विरोधातील निवेदनात मनसेने नेमके काय म्हणले?
जालना तालुक्यातील अनेक शेतकरी आणि कष्टकरी वर्ग फायनान्स कंपन्यांकडून वाहन कर्जावर घेऊन त्यांच्या दैनदिन कामासाठी वापरतात. मात्र काही कारणास्तव व्यक्तिकडून १ हाता जरी थकला तरी फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली एजंटकडून मोबाईल अॅपच्या माध्यमातून गाडी शोधून, त्यांना धमकावतात, शिवीगाळ करताल जबरदस्तीने गाडी ओढून नेतात सवर घटना घडत असताना एजंटकडे कुठलेही ओळखपत्र किंवा सवर फायनान्स कंपनिचे पत्र नसतात हे गुड प्रवृत्तीचे लोक सर्वसामान्य नागरिकाना धमक्या देवून त्यांच्या गाड्या हिसकावून घेतात व पैशाची मागणी करतात नाहीतर गाड़ी गोडावून ला लावण्याची धनकी देतात. हा प्रकार सद्या जालना शहरामध्ये खुप वाढला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खुप त्रास होत आहे सदरील बाब खुप भयंकर असून याकडे लक्ष देवून फायनान्स कंपन्याना RBI नियमाचे पालन कक्षण काम करण्याच निर्देश देण्यात यावे गाडी जप्त करण्या आगोदर संबंधित पोलिस स्टेशनला कळवने (इंटीमेशन) देने बंधन कारक असतांना गुडगिरी करुण कुठलेही इंटीमेशन न देता वाहने जप्त करण्यात येत असून हे सर्व बेकायदेशीर आहे आपण यावर कायदेशीर करवाई करावी. नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रत्येक चौकात उभे राहून आशा गुंडाचा प्रतिकार करतील यातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिति निर्माण झाल्यास याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहिल.
१. या प्रकारच्या वसुली करणाऱ्या एजंटावर त्वरित कडक कारवाई करावी. संबंधित फायनान्स कंपन्याना RBI च्या नियमांचे पालन करावे असे आदेश द्यावे.
२. बेकायदेशीर वसुलीची घटनासंदर्भात पोलिसांनी सक्रियपणे लक्ष घालावे,
३. सर्व एजंटकडे DRA प्रमाणपत्र असने बंधनकारक करावे.
काम झाले की बाजूला करणारा माणूस म्हणजे फडणवीस – जरांगे पाटील.
