पावसाचे दोन थेंबे आणि विजेचा लपंडाव! जालन्याचे नागरिक त्रस्त.
News published by News24tas
जालना:- शहरात गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण व थोडा फार पाऊस पडत आहे. त्यामुळे गरमीला वैतागलेले नागरिक थोडे फार खुश झाले परंतु या त्यांच्या आनंदावर नेहमीप्रमाणे महावितरणाने विरजण टाकले. पाऊसाचे दोन थेंबे पडली नाही की जालन्यात अनेक ठिकाणी लाईट कट होते व पाऊस थांबून ऊन जरी पडले तरी कित्येक तास लाईट येतच नाही.यामुळे जालना शहरातील नागरिक हैराण असून त्यांचा मानसिक छळ हा महावितरण करत आहे असा आरोपच आता जालनेकर करू लागले आहेत. पावसाळा तोंडावर असताना महावितरण विभागाने कुठलेही पूर्व नियोजित पावसाळी कामे केली नाहीत त्यामुळे आता वारंवार विजेचा लपंडाव चालू आहे का असा प्रश्न देखील पडत आहे.
कर्मचाऱ्यांना फोन लावला तर नेहमीप्रमाणे बंद किंवा उचलत नसल्याचे आढळले.
जेवढी कार्यतत्परता कर्मचारी वसुली करताना दाखवतात तेवढी कार्य तत्परता ग्राहकांना सुविधा देतांना का नाही दाखवली जात? महावितरणाच्या कोणत्याही छोट्या अथवा मोठ्या कर्मचाऱ्यांना फोन केले अथवा ऑफिस ला जरी फोन केला तर कधीच तो उचलला जात नाही अनेक वेळा कर्मचाऱ्यांचे फोन तर बंदच असतात जर फोन उचलून ग्राहकांच्या समस्या महावितरण विभागाला जाणून घ्यायच्या नसतील तर त्यांनी सर्व नंबर बंद करून टाकावे असे मत आता नागरिक व्यक्त करीत आहेत. जर एखादी दुर्घटना शहरात घडली कुठली आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि या कर्मचाऱ्यांनी त्यावेळी देखील फोन उचलले नाही व कुठली मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली तर या गोष्टीला जबाबदार कोण राहणार ? उच्च अधिकाऱ्यांनी लाईनमन ना व ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना फोन अटेंड करण्याचे निर्देश द्यावेत किंवा जर काही कालावधी साठी लाईट जाणारच असेल तर वीज ग्राहकांना मेसेज द्वारे पूर्व सूचना तरी द्यावी. अशी मागणी आता वीज ग्राहक करीत आहेत.आगामी काळात जर महावितरण कंपनीने योग्य कार्यवाही करून ग्राहकांना सुविधा दिल्या नाही तर नक्कीच त्यांना जालनेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागेल हे निश्चि
काम झाले की बाजूला करणारा माणूस म्हणजे फडणवीस – जरांगे पाटील.
