मनसेचा एक इशारा आणि रुग्णालय प्रशासन झोपेतून जागे

मनसेचा एक इशारा आणि झोपलेले प्रशासन खडबडून जागे.

News published by News24tas

जालना :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जालना शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात चालू असलेला गैरप्रकार प्रशासन समोर आणला व सदरील गैरसोयी व गैरप्रकारावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिल त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले व प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सुरळीत आरोग्य सेवा देण्यासाठी  आदेशच जारी केले. त्यामुळे आता तरी येणाऱ्या काळात रुग्णांचे हाल व गैरसोय जिल्हा स्त्री रुग्णालयात होणार नाही असे दिसते.

 इशारा

जिल्हा स्त्री रुग्णालय जालनाचे कार्यालयीन आदेश जारी.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष महेश नागवे व पदाधिकारी यांनी इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व सुरळीत आरोग्य सेवा देण्यात यावी. अन्यथा आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेश कर्मचाऱ्यांना जारी केलेत 

मनसेमुळे सदरील गैरप्रकार प्रशासन व जनतेसमोर उघडकीस.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष महेश नागवे व पदाधिकारी यांनी सदरील प्रकार प्रशासनासमोर आणत लेखी तक्रार देत तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली होती त्यावेळी त्यांनी रुग्णालयात चालू असलेले गैरप्रकार व रुग्णांचे होणारे हाल प्रशासनासमोर मांडले होते. त्यावेळी त्यांनी अनेक प्रकारच्या समस्यांच्या तक्रारी ज्या रुग्णांकडून मनसे पदाधिकारी यांना मिळाल्या होत्या त्या प्रशासनाकडे मांडल्या.

जिल्हा स्त्री रुग्णालयातील वारंवार रूग्णालयात उद्भवणाऱ्या समस्या.

१)प्रसूती बाबत – योग्य ती काळजी न घेणे.

२) प्रसव मातांना – व्यवस्थित न बोलणे.

३) प्रसव मातांच्या – नातेवाईकाकडून पैशाची मागणी करणे.

४) उपचाराच्या बदल्यात पैशाची मागणी करणे.

५) रुग्णालयात उपचार ऐवजी खाजगी रुग्णालयात संदर्भित करणे.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या