मराठी माणसाला गृहीत धरू नये रवी राऊत यांचा पालिकेला इशारा.४ दिवसात बदल करा अन्यथा गाड्या फोडू. – राऊत.
News published by News24tas
जालना:- राज्य शासनाने पहिली ते पाचवी पर्यंत मराठी सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यापासून राज्यात पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेट घेतांना दिसत आहे. मनसेने अनेक ठिकाणी आंदोलन करून या हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला असून आंदोलनेही केली आहेत. त्यातच आता जालन्यात देखील मनसेचे जिल्हा अध्यक्ष रवी राऊत यांनी पालिकेवर मराठी डावलत हिंदी भाषा वापरली जात आल्याचा आरोप करत थेट आंदोलनाचा इशाराच दिला आहे.
मागणी मान्य न झाल्यास आयुक्ताची गाडी फोडू ! –
यावेळी माध्यमांशी बोलताना रवी राऊत यांनी पालिकेला विनंती केली की जालना शहरात ज्या घंटा गाड्या कचरा गोळा करण्यासाठी जातात त्या एक तर रोज कचरा गोळा करायला जातच नाही आणि त्याचबरोबर त्यावर जे हिंदी गाण्यांच्या माध्यमातून मराठी डावलली जाते ते आधी बंद करा. चार दिवसाच्या आत जर सर्व घंटा गाड्यावर मराठी भाषा ऐकू आली नाही तर शहरातील घंटा गाड्या व त्यानंतर पालिका आयुक्तांची गाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असे मनसे चे जालना जिल्हा अध्यक्ष रवी राऊत म्हणाले.यावेळी जालन्यातील मनसे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे, जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगधरे, जिल्हा सचिव विलास तिकांडे, मनविसे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब काळे, शहर अध्यक्ष महेश नागवे, मनविसे शहर उपाध्यक्ष वैभव साळे, तालुका अध्यक्ष योगेश कदम,सुशील देशमुख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
