मोदींकडून राज ठाकरेंचे कौतुक राज ठाकरे प्रमाणे दौरे करावे.
News published by news24tas
मुंबई:- राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक निवडणुकीपूर्वी अनेक दिवसांपासून वाढली होती परंतु निवडणुकीनंतर या भेटी गाठींना ब्रेक लागला परंतु आता पुन्हा एकदा भाजप मनसे मैत्रीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आणि त्याला कारण खुद्द भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद मोदी ठरलेत.
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले व राज ठाकरे प्रमाणे काम करा कृती करा असा सल्लाच महायुतीच्या आमदारांना नरेंद्र मोदी यांनी दिला.
आमदारांशी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की,ज्या प्रमाणे राज ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केल्या त्या प्रमाणे राज्यात किंवा राज्या बाहेर विकास कामासाठी तुम्ही देखील असे दौरे करावे.
२०११ सालचा राज ठाकरे यांचा गुजरात दौरा.
३ ऑगस्ट २०११ रोजी राज ठाकरेंनी गुजरातचा दौरा करत नरेंद्र मोदींच्या विकास कामाची पाहणी त्यावेळी केली होती व गुजरात प्रमाणे महाराष्ट्रात विकास व्हावा यासाठी हा पाहणी दौरा असल्याचे त्यावेळी सांगितले होते. त्याचवेळी जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत देखील न्हवते तेव्हा राज ठाकरेंनी पंतप्रधानपदासाठी मोदी यांचे नाव सर्व देशासमोर आणले होते व मोदी सारखा पंतप्रधान देशाला मिळवा असे राज ठाकरे म्हणाले होते.