महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यावर प्रश्नाचा भडिमार!

विजेच्या प्रश्नावर आ. अर्जुन खोतकर आक्रमक.

News published by News24tas

जालना:-शहरासह ग्रामीण भागात विजेची समस्या गंभीर बनली असून, या संदर्भात असंख्य नागरिकांच्या तक्रारी आमदार खोतकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आमदार खोतकर यांनी सोमवारी थेट महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. अधिकाऱ्यांना धारेवर धरत जालना शहरासह जिल्हाभरातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. जालना शहर व ग्रामीण भागात विजेच्या तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. वारंवार दुरुस्ती करून देखील विजेची समस्या का सुटत नाही? वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे काय ? त्यावर तातडीने उपाययोजना का होत नाहीत? निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या एजन्सीला काळ्या यादी का टाकले जात नाही? मर्जीतल्या लोकांनाच कामे दिली जातात. या संदर्भात जाब विचारला. बोगस काम करणाऱ्या एजन्सीला काळ्या यादी टाका व त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा. अनेक ठिकाणी उघडचावर रोहित्रे दिसतात त्यामुळे अपघात होतात. ज्या भागात महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होतो त्याच भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण देखील शहरांमध्ये आढळून येते. तसेच जालना शहरात अनेक ठिकाणी रहदारीच्या मार्गावरच विजेचे खांब आहेत. वारंवार सूचना करूनही हटविले जात नाहीत. यामुळे अपघात होतात. या संदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देखील आमदार खोतकर यांनी केल्या. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विज बिलाच्या तक्रारी तात्काळ सोडवाव्यात- आ. अर्जुन खोतकर

विजबिला संदर्भात अनेक तक्रारी असून, अव्वाच्या सव्वा बिले ग्राहकांना दिली जातात. तक्रार करून देखील वेळेवर बीज बिलाची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्ना समस्येला सामोरे जावे लागते. यामध्ये तातडीने कारवाई करावी, दिरंगाई व काम चुकारपणा करणान्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचनाही आ. खोतकर यांनी बैठकीत दिल्या, यावेळी बैठकीस शिवसेना जिल्हा संपर्क नेते पंडित भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, गणेश मोहिते, युवासेना उपजिल्हाप्रमुख वसंतराजे जाधव, शिवसैनिकांसह अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता अधिकार, शाखा अभियंता संजय गहाणे शाखा अभियंता नागरे व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोकणात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता.मनसे नेत्याला शिवसेनेत येण्याची ऑफर.

राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या हुंडाबळी प्रकरणाची चर्चा,मात्र गरोदर पूजाला न्याय अजूनही का नाही? 

विद्यापीठाचा भोंगळ कारभाराने विद्यार्थी त्रस्त! गाऱ्हाणे ऐकायला एकही अधिकारी नाही

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या