कुणाल कामराचा आणखी एक व्हिडिओ वायरल पुन्हा होणार वाद!
News published by News24tas
मुंबई:-सध्या महाराष्ट्राचे विधान भवन असो किंवा सोशल मिडिया सर्व ठिकाणी एकच चर्चा आहे ती म्हणजे कुणाल ने गायलेल्या शिंदे यांच्यावरील गाण्याची. प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने गायलेल्या गाण्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन सेना आमने सामने आल्या असून शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना ( उबाठा) यांच्यात चांगलेच युद्ध रंगले आहे.विरोधक कुणाल कामराच्या पाठीशी उभे आहेत तर सत्ताधारी पक्ष याचा निषेध नोंदवत आहेत.एवढाच काय तर सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा याने ज्या ठिकाणी हे गाणे चित्रित केले ते स्टुडिओच फोडला व फोन कॉल द्वारे कुणाल ला धमक्या देखील दिल्या. आता यासर्व प्रकरणावर कुणालने प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ पोस्ट केला व झालेल्या तोडफोडीवरून ‘हम होंगे कंगाल एक दिन…’ असे गाणे वापरत शिवसेना शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचले आहे.त्यामुळे शांत होणारे हे युद्ध पुन्हा एकदा तापणार हे निश्चित.
संजय राऊत यांनी कुणालचा तो व्हिडिओ रिपोस्ट करत काय म्हणले?
शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी कुणाल कामराने पोस्ट केलेला ‘हम होंगे कंगाल’ हा व्हिडिओ रिपोस्ट करत म्हणले की ये तो अपूण जैसा निकला…ये भी झुकेगा नहीं साला! जय महाराष्ट्र .
त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही सेनेत वाक्-युद्ध रंगणार हे निश्चित.
बघा संपूर्ण व्हिडिओ खालील लिंक वर…
https://x.com/kunalkamra88/status/1904466272450199742?t=XxBvK77hTf65IpW4Ydw9SQ&s=19
