पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, महिनाभरानंतरही कारवाई शून्य !
News published by News24tas
पुणे:– सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे विवाहितेने आत्महत्या केली. राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे, परंतु वैष्णवीप्रमाणे पुण्यातील हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मूळ परभणी जिल्ह्यातील पूजा गजानन निर्वळ या २२ वर्षीय विवाहितेने स्पाइन सिटी, महाळुंगे येथे २७ एप्रिल रोजी गळफास घेऊन जीवन संपवले. ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा तिच्या आई वडिलांचा आरोप आहे. गरीब कुटुंबातील असल्याने या प्रकरणाची कुठेही दखल घेण्यात आलेली नाही. पोलिसही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा पूजाच्या आई रेखा बोचरे यांचा आरोप आहे. ‘काही नको, फक्त आमच्या पूजाला न्याय मिळवून द्या’, अशी आर्त हाक त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पूजाने सासरच्या अत्याचाराला कंटाळून लग्नाच्या पाच महिन्यांतच आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना घडली तेव्हा ती ३ महिन्यांची गरोदर होती. वडील गणेश बोचरे यांनी महाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. परभणी जवळील एका छोट्या खेड्यातील कुटुंबाला एफआयआर दाखल करण्यासाठीही रात्री ११ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अवघ्या काही महिन्यातच पूजाचा हुंडाबळी !
बोचरेंनी मुलगी पूजाचे लग्न शेलवाडीतल्या गजानन निर्वळ यांच्यासोबत पक्के केले. लग्नात थेट हुंडा न घेता त्यांनी फ्रिज-कपाटापासून सर्व घरगुती सामानाची मागणी व लग्न चांगल्या पद्धतीने करून मागितले. ३ डिसेंबर २०२४ ला लग्न झाले. त्यानंतर पूजा नवरा, सासू-सासरे, नणंद व तिच्या २ मुलांसह पुण्यातील स्पाइन सिटीत राहायला आली. सुरुवातीचे ३ महिने आनंदात गेले. मात्र नंतर गाडी घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आण, असा तगादा पती गजानन निर्वळ याने पूजाकडे लावला. आधीच लग्नाची उसनवारी झाल्याने वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. येथूनच पूजाला पतीकडून मानसिक व शारीरिक प्रास देण्यास सुरुवात झाली.
कोकणात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता.मनसे नेत्याला शिवसेनेत येण्याची ऑफर.
