विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे जालन्यात आंदोलन .
news published by news24tas
जालना:– आपल्या विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी ( दि. 28) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.निदर्शनापूर्वी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने अंबड चौफुलीवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, जिल्हाध्यक्ष राहूल मुळे, लक्ष्मीबाई भुतडा,मुन्नाभाऊ दायमा, सतीश फतपुरे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार आर. के. मेंडके यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलन वेळी निवेदनात मांडलेल्या दिव्यांगांच्या मुख्य मागण्या कोणत्या?
या निवेदनात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात दिव्यांगांना सहा हजार मानधन सुरू करावे. जालना शहरातील मधुबन कॉलनी किंवा मस्तगड येथे दिव्यांगांसाठी पुनर्रवसन केंद्र सुरू करावे, ग्रामपंचायतीच्या धर्तीवर दिव्यांगांना नगर पंचायत, नगर परीषद, महानगर पालीकामधे नळपट्टी, घरपट्टीमध्ये 50 टक्के सूट देण्यात यावी, दिव्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे, दिव्यांगांना दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडुन विनाअट व विनाहमी १० लक्ष रूपये कर्ज देण्याची तरतुद करण्यात यावी, दिव्यांगांना उधारनिर्वाह करण्यासाठी ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, महानगर पालिका यांनी शासन निर्णय नुसार 200 स्वेअर. फुट जागा उपलब्ध करून देण्यात यावी, दिव्यांगासाठी 2016 मधील कायद्याची देशभर कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी, दिव्यांगांसाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकिय रुरणालय, महानगर पालिका आदी शासकीय कार्यालयामध्ये स्वतंत्र खिडकी निर्माण करण्यात यावी,म्हाडा काॅलनी येथील दिव्यांग सविता बोराडे यांच्या वरती सतत अन्याय होत असून याकडे तालुका पोलीस ठाणे दुर्लक्ष करत आहे तातडीने आरोपीला अटक करण्यात यावी दरवर्षी स्थानिक आमदार फंडातून निधीतुन दिव्यांगावर 30लक्ष खर्च करण्यात यावा,दिव्यांगाचा बचत गटांना 2 लाख अनुदान देण्याची तरतुद करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश असून सदरील मागण्याची त्वरीत दखल घेऊन त्या सोडविण्यात याव्यात नसता सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने शांततेच्या मार्गाने व लोकशाही पध्दतीने येत्या काही दिवसात संपुर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या वेळी जगदीश सातपुते, विठ्ठल चव्हाण, सुरेश बोराडे, सतीश वाघ, इंदुबाई अवसरमोल, ठकुबाई डोंगरे, रोशन अवसरमोल, कांताबाई आघाम,सागरबाई धोंगडे, गणेश खंदारे, नागेश अंबिलवादे, शहादेव कोल्हे, अनिल महापुरे,रेहान निसार शेख, शेख शफीकमिया, गोविंद चिखले, रुख्मिणी सपकाळ, सुनंदा भास्करे, बाळू आगलावे, विलास कांबळे, राजेश कावेटी,सुधाकर पवार, साबेर शेख, शेख इक्बाल, सुनिता खंदारे, नंदकिशोर चव्हाण, पुरूषोत्तम अडाणी, सुनिता लोळगे,भीमराव साळवे, नानाभाऊ सुरासे,अशोक कणके आदींची उपस्थिती होती.
जालन्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिला पाठींबा
जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढत निदर्शने केले असून दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दिव्यांगाच्या मागण्यांसाठी पाठिंबा दिला आहे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले सुभाष चंद्र बोस संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे आदींनी दिव्यांगाच्या मागण्यासाठी यावेळी पाठिंबा दिला.
दिव्यांगाच्या मागण्यांसाठी महापालिकेत आणि जिल्हा परिषद लवकरच बैठक लावणार -आमदार अर्जुन खोतकर.
दिव्यांगांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निदर्शने केले असून दिव्यांगाच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यासाठी लवकरच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेत बैठक लावून दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिव्यांना दिली आहे.
भटक्या श्वानावर उपाय योजना कधी ? शहरातील १००० नगरिकांना आत्तापर्यंत चावा.
