पत्राद्वारे राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन!
News published by News24tas
मुंबई:- सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे नावाची जोरदार चर्चा चालू असताना राज ठाकरे यांचे एक पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. येत्या १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस असून त्या दिवशी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणले आहे की,कृपया वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही शिवतीर्थावर येऊ नका. जिथे आहात तिथेच लोकउपयोगी कामे करा असे म्हणत कार्यकर्त्यांना पत्रा द्वारे आवाहन केले आहे.
राज ठाकरे नेमके काय म्हणले?
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो, सस्नेह जय महाराष्ट्र ! येत्या १४ जून २०२५ ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिक्शी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजय का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का ? इत्यादी पण मनापासून सांगतोय की बरतर असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका. भेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे जणं येवा, तुमच्याशी त्या दिक्शी बोलणं होत नाही पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट हि ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम । आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढे देखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही. यामुळे त्याची मला स्वस्व लागेलच! पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन. त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची वसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.
आदेश लवकर जारी करा अन्यथा…! – राज ठाकरेंनी दिला सरकारला इशारा.
हिंदी आमची लाडकी बहीण सरनाईकांचे वादग्रस्त वक्तव्य! शिवसेना मनसे आक्रमक.
