विष्णु पाचफुले यांनी दिली संपूर्ण प्रकरणाची माहिती.
News published by News24tas
जालना:– जालना शहरात काही दिवसांपूर्वी एका तरुणाने शिवाजी महाराजांचे व संभाजी महाराज यांचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर सदरील घटनेमुळे जालना शहरात संतापाची लाट पसरली होती व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली व तत्काळ सदरील तरुणाला अटक देखील केली. परंतु नंतर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी विधासभेत सदरील मुद्दा मांडत या प्रकरणी कारवाई करण्यात यावी व सदरील तरुण हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्याने हे गैर कृत्य केले असा आरोप खोतकर यांनी केला. खोतकर यांच्या आरोपानंतर ती व्यक्ती काँग्रेसचा कार्यकर्ता नाही असे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.व काही दिवसांनी लगेचच जालना शहरात त्या तरुणाचे शिवसेनेचे नेते विष्णू पाचफुले यांच्या सोबतचे फोटो व्हायरल होऊ लागले त्यामुळे चर्चांना उधाण येऊन अनेक अफवा पसरल्या गेल्या या सर्व प्रकरणावर व व्हायरल होत असलेल्या फोटोवर विष्णू पाचफुले यांनी स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली.
राजकीय द्वेषापोटी माझ्या नावाची बदनामी- विष्णु पाचफुले.
जालन्यातील कन्हैयानगर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे बॅनर फाडणाऱ्यांशी आपला काहीही संबंध नसून शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी आपली उमेदवार म्हणून घोषणा झाल्याने राजकीय द्वेषापोटी आपली बदनामी केली जात असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णु पाचफुले यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रसार माध्यमांशी बोलतांना पाचफुले म्हणाले की, कन्हैयानगर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे बॅनर फाडणाऱ्या तरूणासोबत असलेले असलेले आपले फोटो समाज माध्यमावर प्रसारित झाले आहे. मुळात बॅनर फाडणाऱ्यांशी आपला काही एक संबंध नाही, शिवसेनेचा शहरप्रमुख असल्याने शिवाय आमचे नेते आमदार अर्जूनराव खोतकर यांनी महापौर पदासाठी उमेदवार म्हणून आपल्या नावाची घोषणा केल्याने विरोधक राजकीय द्वेषापोटी आपल्या नावाची बदनामी करीत असून बॅनर फाडणाऱ्या तरूणाचा व आपला काही संबंध नसल्याचा पुन:रूच्चारही पाचफुले यांनी यावेळी बोलताना केला.यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, मराठा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडून, मेघराज चौधरी ,शुभम जयस्वाल ,शुभम टेकाळे आदींची उपस्थिती होती.
