मराठी माणसाला संकटात राज ठाकरेच आठवले आणि मदतीला देखील तेच धाऊन आले.
News published by news24tas
मुंबई:- काल परवा पासून कल्याण आणि ठाण्यातून परप्रांतीयांनी मराठी माणसाला मारहाणीचे व्हिडिओ आणि बातम्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया व समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. कालच कल्याण येथील एका उच्चभ्रू सोसायटीत शुल्लक कारणावरून मराठी कुटुंबाला अगदी जिव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली नंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रीया दिली निषेध देखील नोंदवला एवढच काय तर हा मुद्दा नागपूर येथील चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील गाजला व समंधीत अधिकाऱ्याला निलंबित देखील करण्यात आले अटक ही झाली कारवाई देखील झाली. पण या सगळ्या घटना घडत असताना नेटिजनस् आणि मराठी माणसाला आठवले ते फक्त राज ठाकरे राज ठाकरेंचा जर निवडणुकीत दारूण पराभव झाला नसता तर अशी घटना घडली नसती त्यांचा एक प्रकारचा वचक परप्रांतीयांवर होता त्यामुळे अशी घटना घडली नसती अश्या पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्या.
घटना घडल्यानंतर यावर राज ठाकरेंची प्रतिक्रीया देखील आली.
मारहाणी प्रकरणावर राज ठाकरे यांनी सरकारला इशारा देत थेट आव्हान केले की त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला दम देत करवाई ची मागणी केली व सदरील आरोपी पदावरून निलंबित देखील झाला.
ठाण्यात राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकच मदतीला धाऊन आले.
कल्याण मधील घटना शांत होण्याअगोदरच बातमी आली ती ठाण्यातून ठाण्यात विविआना मॉल मध्ये एका सुरक्षा रक्षकाने जो की परप्रांतीय होता त्याने एका मराठी रिक्षा चालक असलेल्या महिलेला शिवीगाळ करत महिलेला मारहाण केली. त्यानंतर माहिती मिळताच अविनाश जाधव जे की मनसेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष आहेत ते तात्काळ घटनास्थळी गेले व त्या सुरक्षा रक्षकाला चांगलाच चोप दिला व त्या महिलेचे पाय धरायला लावले व माफी मागायला लावली. अविनाश जाधव ठाण्यातील कोणत्याही समस्येची माहिती मिळताच सर्वात आधी मदतीला धाऊन जाणरे व्यक्तिमत्त्व पण झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा दारूण पराभव झाला.मदतीला येणाऱ्या नेत्यापेक्षा शे – दोनशे देणारे नेते निवडून आले पण तरी देखील पराभव मनात न ठेवता अविनाश जाधव मदतीला धावले हे विशेष.
थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या जनतेने मनसेला आणि राज ठाकरेंना निवडणुकीत जरी नाकारले असेल तरी देखील संकट काळात जनतेला नेहमीच राज ठाकरे आठवतील व मदतीला देखील राज ठाकरेच येतील.